Rohit Sharma to Miss 1st Test IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटीपूर्वी रोहित शर्माबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. पर्थ येथे खेळवण्यात येणाऱ्या या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा खेळणार नसल्याचे त्याने बीसीसीआयला स्पष्ट केले आहे, असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पर्थ येथे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा खेळणार नाही. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, रोहित शर्माने बीसीसीआयला ही माहिती दिली आहे आणि त्याने सांगितले आहे की त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर त्याला त्याच्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवायचा आहे. रोहितच्या अनुपस्थितीत संघाचा उपकर्णधार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाची कमान सांभाळेल. रोहित ६ डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये सामील होईल म्हणजेच तो दुसरा कसोटी सामना खेळणार आहे.

हेही वाचा – संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO

रोहितच्या अनुपस्थितीमुळे भारतीय निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारत ए संघाचा भाग असलेल्या देवदत्त पडिक्कलला फक्त ऑस्ट्रेलियात थांबण्यास सांगितले आहे. पर्थमधील ओपस स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी रोहितच्या जागी पडिक्कलचा १८ सदस्यीय भारतीय संघात समावेश करण्यात येईल.

हेही वाचा – ENG vs WI: वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! संथ सुरूवातीनंतर षटकारांचा पाऊस, कॅरेबियन संघाने मोडला ७ वर्षे जुना विक्रम

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला आशा होती की तो (रोहित) ऑस्ट्रेलियाला जाईल, परंतु त्याने बीसीसीआयला कळवलं आहे की त्याला आणखी काही वेळ हवा आहे आणि त्यामुळे तो आताच ऑस्ट्रेलियाला जाऊ शकत नाही. ॲडलेड येथे होणाऱ्या दुसऱ्या पिंक टेस्ट सामन्यासाठी तो ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीच्या दरम्यान नऊ दिवसांचं अंतर आहे, त्यामुळे रोहित शर्मा वेळेत संघात दाखल होईल.”

हेही वाचा – Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या खांद्यावर ‘या’ संघाने कर्णधारपदाची दिली जबाबदारी! अजिंक्य रहाणेही अय्यरच्या नेतृत्त्वाखाली खेळणार

शनिवारी सामन्याच्या सिम्युलेशन दरम्यान क्षेत्ररक्षण करताना शुबमन गिलचा अंगठा फ्रॅक्चर झाल्यानंतर भारताच्या फलंदाजीच्या क्रमवारीत निश्चितपणे बदल होतील. गिल पहिल्या कसोटीला मुकणार आहे आणि त्यामुळे केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार आहे. रोहितच्या अनुपस्थितीत, यष्टिरक्षक ध्रुव जुरेलला एक फलंदाज म्हणून संधी मिळू शकते. जुरेलने ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात ८० आणि ६४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत स्वत:ला सिद्ध केले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma to miss first test against australia jasprit bumrah to captain in perth devdutt padikkal will be added to the 18 member squad bdg