दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघात सलामीवीराची भूमिका बजावणार आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली. या संघात सलामीवीर लोकेश राहुलला संघातून डच्चू देत शुभमन गिलला संघात स्थान देण्यात आलं आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना, एम.एस.के.प्रसाद यांनी रोहितला कसोटीत सलामीवीर म्हणून संधी देणार असल्याचं सांगितलं.
Want to give Rohit Sharma an opportunity to open the innings in Tests – MSK Prasad
— BCCI (@BCCI) September 12, 2019
विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेत लोकेश राहुल पुरता अपयशी ठरला होता. त्यामुळे अनेक माजी खेळाडूंनी रोहित शर्माला सलामीला संधी द्यावी अशी मागणी केली होती. खुद्द प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वी या मागणीबद्दल सकारात्मकता दर्शवली होती. यानंतर अपेक्षेप्रमाणे भारतीय संघातून लोकेश राहूलला डच्चू देण्यात आला आहे.
आफ्रिकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी असा असेल भारताचा संघ –
विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि शुभमन गिल