IND vs AUS Melbourne Test: मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाने बेधडक फलंदाजी करत पहिल्याच दिवशी ३११ धावा धावफलकावर लावल्या आहेत. भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये या सामन्यासाठी मोठा बदल करण्यात आला आहे. शुबमन गिलच्या मेलबर्न कसोटीसाठी वॉशिंग्टन सुंदरला संघात संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार आणि रोहित शर्मा कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याचं उत्तर आता भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी पत्रकार परिषदेत दिलं आहे.
रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार याबाबत कोचने अपडेट दिलेच. पण त्याचबरोबर शुबमन गिलला प्लेईंग इलेव्हनमधून का वगळण्यात आलं, हेही अभिषेक नायरने पहिला दिवसाचा खेळ संपल्यानंतर सांगितलं.
रोहित शर्मा सलामीला उतरणार असल्याचे अभिषेक नायरने पत्रकार परिषदेत सांगितले. मेलबर्न कसोटीपूर्वीच हा निर्णय घेण्यात आला होता. रोहित सलामीला उतरणार म्हणजे केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. तर यशस्वी आणि रोहितची जोडी सलामीला येईल. मेलबर्नची खेळपट्टीही रोहित शर्मासाठी सलामीसाठी सर्वोत्तम आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन सलामीवीर कॉन्स्टन्स आणि उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या सत्रात आरामात धावा केल्या. बुमराहसारखा गोलंदाजही खूप महागडा ठरला.
भारताचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर म्हणाले, “रोहित शर्मा या सामन्यात टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करणार आहे. इतकंच काय तर रोहित शर्मा डावाची सुरूवात देखील करणार आहे.” रोहित शर्मा यशस्वीबरोबर सलामीला उतरला तर केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल आणि विराट कोहली चौथ्या क्रमांकावर उतरेल.
रोहित शर्मा मधल्या फळीत फलंदाजी करताना धावा करू शकला नाही, त्याचबरोबर मैदानावरही तो सहज दिसत होता. या वर्षाच्या सुरूवातील बांगलादेशविरूद्धची कसोटी मालिका वगळता रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताने एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. त्यामुळे सर्वच गोष्टीचा दबाव असलेला रोहित शर्मा मेलबर्न कसोटीतून पुन्हा पुनरागमन करणार का यावर सर्वांच्या नजरा आहेत.
भारताच्या प्लेईंग इलेव्हनमधून शुबमन गिलला का वगळण्यात आलं?
ॉ
शुबमन गिलला प्लेईंग इलेव्हनमध्ये का वगळण्यात आलं या प्रश्नाचं उत्तर देताना अभिषेक नायर म्हणाले, मलाही शुबमन गिल बाहेर झाल्याने वाईट वाटतंय पण गिलही समजू शकतो की संघ संयोजनासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. त्याला ड्रॉप करण्यात आलेलं नाही. मेलबर्नची खेळपट्टी पाहता संघाला २ फिरकीपटूंना संधी द्यायची होती. त्यामुळे जडेजा आणि वॉशिंग्टन यांना संधी देण्यात आली.