Rohit Sharma Viral Video: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यात होणार आहे. दुस-या कसोटीपूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो सरावानंतर स्टेडियममधून जाताना चाहतीला ऑटोग्राफ देतो. आपण नेहमीच पाहिलं आहे की रोहित शर्मा अनेकदा चाहत्यांना निराश न करता त्यांना ऑटोग्राफ देतो. त्यांच्याबरोबर सेल्फी घेतानाही रोहित शर्मा दिसला आहे. असाच एक व्हीडिओ रोहित शर्माचा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ज्यात एका चाहतीने रोहितकडून ऑटोग्राफ घेतल्यानंतर त्याला खास विनंती केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीपूर्वी मैदानातून सराव करून परतत असताना स्टॅन्डमध्ये असलेल्या एका चाहतीला रोहित शर्माचा ऑटोग्राफ हवा होता. रोहितने तिला निराश नाही केलं. चाहतीने रोहितला येताना पाहताच म्हणाली, “रोहित प्लीज एक ऑटोग्राफ दे.” यावर रोहितही आलो म्हणत ऑटोग्राफ देण्यासाठी पोहोचला. रोहितने ऑटोग्राफ दिल्यानंतर चाहतीने रोहितचे आभार मानले आणि पुढे म्हणाली, “मी विराट कोहलीची खूप मोठी चाहती आहे, त्याला सांगा की मी त्याची खूप मोठी चाहती आली होती.” यावर रोहित शर्मा हसत हसत म्हणाला, “हो ठीके मी सांगतो.”

हेही वाचा – IND vs NZ: “त्यांना माहितीय ते कारकिर्दीच्या…”, रोहित शर्माकडून सर्फराझचा उल्लेख करत ट्रोल होणाऱ्या केएल राहुलला अल्टीमेटम

रोहित शर्माचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भारत वि न्यूझीलंड यांच्यातील पुणे कसोटी सामना येत्या २४ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या कसोटी सामन्यापूर्वी रोहित शर्मा सरावासाठी पोहोचला, तिथे त्याने खेळपट्टीची पाहणी केली आणि नेटमध्ये सरावही करतानाही दिसला.

हेही वाचा – IND vs NZ : पुण्याच्या खेळपट्टीवर वेगवान की फिरकी गोलंदाज, कोणाचे वर्चस्व पाहायला मिळणार?

भारताला न्यूझीलंडविरूद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ८ विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली, ज्यात वॉशिंग्टन सुंदरला संघात संधी देण्यात आली आहे. दिल्लीविरुद्ध सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात तामिळनाडूसाठी १५२ धावा केल्यानंतर या २५ वर्षीय खेळाडूचा संघात समावेश करण्यात आला आहे. जानेवारी २०२१ मध्ये गाबा येथे भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयात वॉशिंग्टनने महत्त्वाची भूमिका बजावली होती. पदार्पणाच्या कसोटीत त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma viral video with female fan who gives message for virat kohli said tell him i am his big fan ind vs nz bdg