ICC Test Rankings : भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) बुधवारी जारी केलेल्या रॅंकिंगमध्ये सहा अंकांचं नुकसान झालं आहे. पण अश्विन इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अॅंडरसनसोबत संयुक्तपणे नंबर वन टेस्ट गोलंदाज बनला आहे. अश्विन मागच्या आठवड्यात टेस्ट गोलंदाजीच्या रॅंकिंगमध्ये नंबर एकवर पोहोचला होता. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंदोरमध्ये तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातील दोन्ही डावात फक्त चार विकेट्स घेतले होते.
नंबर एकच्या रेसमध्ये अनेक गोलंदाज
ऑस्ट्रेलियाने तिसरा कसोटी सामना ९ विकेट्सने जिंकला होता. २०१७ नंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाज भारतात सामना जिंकला. अश्विनचे आता अॅंडरसनच्या बरोबरीत ८५९ गुण झाले आहेत आणि संयुक्तपणे तो अव्वल स्थानी आहे. जगातील नंबर वन गोलंदाज बनण्यासाठी जोरदार स्पर्धा रंगली आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंस, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियोनही अव्वल स्थानापासून जास्त दूर नाही.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या अंतिम दोन सामन्यात वैयक्तिक कारणामुळं बाहेर असलेल्या कमिंसचे ८४९ गुण आहेत. तो तिसऱ्या स्थानावर आहे. याचदरम्यान वेस्टइंडीजच्या विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ८ विकेट घेणारा रबाडा तीन अंकांनी आघाडी घेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे ८०७ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू लियोन इंदोरमध्ये ११ विकेट घेतल्यामुळं पाच नंबर्सने आघाडी घेत नवव्या स्थानावर पोहोचला आहे.
टॉप १० मधून रोहित शर्मा बाहेर
फलंदाजीच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज उस्मान ख्वाजा दोन नंबर पुढे जाऊन नवव्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय संघाचा कर्णधार टॉप-१० मधून बाहेर झाला आहे. दोन स्थानांचं नुकसान झाल्यानंतर तो ११ व्या स्थानी पोहोचला आहे. विराट कोहली २० व्या नंबरवर आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन पहिल्या स्थानावर आहे. स्मिथ दुसऱ्या आणि जो रूट तिसऱ्या स्थानावर आहे.