Rohit Sharma Virat Kohli Dandiya with Stumps Video: भारताने न्यूझीलंड संघावर ऐतिहासिक विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे जेतेपद पटकावले. यानंतर भारताचे दोन स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्माने अनोख्या पद्धतीने दांडिया खेळत संघाचा विजय साजरा केला. टीम इंडियाला T20 विश्वचषक २०२४ मध्ये विजेतेपद मिळवून दिल्यानंतर, कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्या मदतीने आता टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

भारताच्या या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयाचा आनंद इतका शिगेला पोहोचला होता की विराट रोहितने मैदानावर जात शानदार सेलिब्रेशन केलं. रोहित आणि विराटचे सेलिब्रेशनही तितकेच नेत्रदीपक होते कारण भारतीय संघातील दोन मोठ्या खेळाडूंनीही लहान मुलांप्रमाणे स्टंप उचलून दांडिया खेळण्यास सुरुवात केली.

दुबईत खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत रवींद्र जडेजाने विजयी चौकार लगावताच संपूर्ण स्टेडियम आनंदाने दुमदुमले. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्येही विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. सर्व खेळाडूंनी एकमेकांना मिठी मारली, हस्तांदोलन केले आणि लगेच मैदानात उतरून विजयाचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. विशेषतः रोहित आणि विराटने स्टंप्स उचलत त्याने हे दोघे दांडिया खेळताना दिसले. रोहित-विराटच्या हा व्हीडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

रोहित आणि विराट हे दोन्ही खेळाडू २०१३ च्या संघाचा भाग होते, जेव्हा भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर २०१७ मध्ये याच स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताचा पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले तेव्हा दोघेही संघाचा भाग होते. आता, रोहित आणि विराट सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत होते आणि त्यांनी स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

Story img Loader