Rohit Sharma Seen on Dubai Streets Viral Video: चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारतीय संघाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवले जात आहेत. टीम इंडियाने स्पर्धेतील पहिले दोन्ही सामने जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताने बांगलादेश आणि पाकिस्तानविरूद्ध चांगली कामगिरी करत दोन्ही सामने सहजतेने जिंकले. दरम्यान भारतीय संघ सध्या दुबईत असून संघाचा पुढील सामना गट टप्प्यातील अखेरचा सामना असणार आहे. दरम्यान रोहित शर्माचा दुबईतील एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

भारताचा आता गट टप्प्यातील तिसरा सामना २ मार्चला न्यूझीलंडविरूद्ध होणार आहे. सलग दोन सामने खेळल्यानंतर भारतीय संघ काही दिवसांच्या विश्रांतीवर आहे. कारण त्यांचा पुढचा सामना २ मार्चला असणार आहे. त्यामुळे खेळाडू विश्रांती घेत आहेत तर काही खेळाडू दुबईत फिरण्याचा आनंद लुटक आहेत. दरम्यान, रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो दुबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे.

कर्णधार रोहित शर्मा भारतीय संघाचे फिल्डिंग कोच टी दिलीप यांच्याबरोबर दुबईत रस्त्यावर फिरताना दिसत होता. रोहित सुरूवातीला साधारणपणे रस्त्यावरून चालत होता. पण काही वेळातच चाहत्यांनी रोहितला घेरले आणि सेल्फी काढण्याची स्पर्धा लागली. रोहितच्या आजूबाजूला चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली.

क्षेत्ररक्षणासह भारताने आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. भारताने दोन्ही सामन्यात विरोधी संघांना ऑलआऊट केले आहे. शुबमन गिल आणि विराट कोहली यांनी शतकं झळकावली आहेत. सलामीवीर गिल सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. तर मधल्या फळीत श्रेयस अय्यरही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. भारताचे टॉप-५ फलंदाजांशिवाय इतर फलंदाजांना मैदानावर उतरण्याची गरज भासली नाही.

गोलंदाजीतही भारताने जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत चांगली कामगिरी केली आहे. मोहम्मद शमीने दोन सामन्यांत पाच बळी घेतले असून तो या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज आहे. हर्षितने चार विकेट घेतल्या आहेत.

गोलंदाजीतही भारताने जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत चांगली कामगिरी केली आहे. मोहम्मद शमीने दोन सामन्यांत ५ विकेट घेतले असून तो या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज आहे. हर्षितने चार विकेट घेतल्या आहेत. तर कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी ३-३ विकेट घेतले आहेत. तर जडेजाही चांगल्या फॉर्मात आहे.

Story img Loader