अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, आणि हरभजनसिंग यांच्यानंतर आता रोहित शर्माही लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. रोहित आपली मैत्रिण रितिका सजदेसोबत लग्नाच्या बंधनात अडकतो आहे. मुंबईत हा शानदार विवाहसोहळा होत असून, रोहितच्या लग्नाला टीम इंडियातील कोणकोणते खेळाडू उपस्थित रहाणार याची चाहत्यांमध्ये उत्सुक्ता आहे.
रोहित आणि रितीका गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. सुरवातीला दोघांचे नाते व्यवसायिक होते. रितिका रोहीतची मॅनेजर म्हणून काम संभाळत होती. दरम्यान दोघांत मैत्रीचे नाते तयार झाले आणि पुढे या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मुंबईतल्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे.

Story img Loader