Ritika Sajdeh Trolled on Social media: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. रितिका सजदेहला नाव ठेवणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. एक्सवर तर रितिकासह रोहितलाही ट्रोल केलं जात आहे आणि यामागचं कारण म्हणजे रितिका सजदेहतची इन्स्टाग्राम स्टोरी. या इन्स्टाग्रामच्या एका स्टोरीवरून रितिका सजदेह सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. रितिकाने इन्स्टाग्रामवर ‘ऑल आइज ऑन रफा’च्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे. ही पोस्ट पाहताच तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. रितिकासह भारत आणि जगभरातील अनेक सेलिब्रेटींनी हा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

आज म्हणजेच मंगळवारी सकाळपासून सोशल मीडियावर रफा हा शब्द ट्रेंड करत आहे. हा फोटो इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षाशी निगडित आहे. गाझाच्या दक्षिण भागात वसलेल्या रफा शहरामध्ये इस्रायलने हल्ला केल्यानंतर जगभरात निषेधाचे सूर उमटताना दिसत आहेत. इस्रायलने अलीकडेच पॅलेस्टिनी विस्थापितांनी उभ्या केलेल्या शरणार्थी छावणीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये मोठ्या संख्येने निष्पाप लोक मारले गेले आहेत. त्यामध्ये लहान मुले आणि वयोवृद्धांचा समावेश असून, अनेक लोक जखमीही झाले आहेत.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
why Shatrughan Sinha married Poonam despite his affair with Reena Roy
रीना रॉयबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं? शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “निर्णय घेणं…”
Anurag Kashyap Daughter Haldi Ceremony
वयाच्या २३ व्या वर्षी अनुराग कश्यपची लेक अडकणार विवाहबंधनात! हळदीला सुरुवात, होणारा जावई कोण?
Rohit Sharma Statement on Mohammed Siraj and Travis Head Fight in IND vs AUS 2nd Test
IND vs AUS: “मर्यादा ओलांडायला नको…”, रोहित शर्माने सिराज-हेडच्या वादात भारतीय गोलंदाजाची घेतली बाजू, सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य

या हल्ल्यानंतर ‘ऑल आइज ऑन रफा’ हा हॅशटॅग सोशल मीडियावर जगभरात ट्रेंड होऊ लागला. त्यानंतर रितिका सजदेहने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ‘ऑल आइज ऑन रफा’ असे इंग्रजीत लिहिलेला फोटो शेअर केला. पॅलेस्टाईनमधील लोकांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने रितिकाला ट्रोल केले जात आहे.आहे.

रितिका सजदेहसोबतच रोहितलाही सोशल मीडियावर टार्गेट केले जात आहे. युजर्सनी रितिकाला फटकारले आणि म्हटले की हे लोक पाकिस्तान आणि बांगलादेशातील हिंदूंवर हिंसाचार होतात तेव्हा गप्प राहतात, पण पॅलेस्टाईनमध्ये घडणारी घटना पाहून यांना वेदना झाल्या. रितिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती अनेकदा सामाजिक विषयांवर आपले मत मांडते.

रफामधील या घटनेनंतर रितिकाने एक इन्स्टा स्टोरी देखील पोस्ट केली होती. पण आता खूप ट्रोल झाल्यानंतर तिने तिची इन्स्टा स्टोरी डिलीट केली आहे. दक्षिण गाझा शहर रफामध्ये इस्रायली हल्ल्यामुळे लागलेल्या आगीत ४५ लोकांचा मृत्यू झाला. हे सर्व लोक पॅलेस्टाईनमधील विस्थापित लोक होते. इस्रायलच्या या हल्ल्यावर जगभरातून टीका होत आहे. या इन्स्टाग्राम स्टोरीवरून रितिका पॅलेस्टाईनचे समर्थन करत असल्याचे चाहत्यांना वाटले आणि त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Story img Loader