Rohit Sharma Ritika Sajdeh Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि पत्नी रितिका सजदेह दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. बांगलादेश कसोटी मालिकेनंतर रोहित शर्मा विश्रांती घेत होती. त्यादरम्यान रोहित आणि रितिकाचा एअरपोर्टवरील एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्याचा रितिकाचा बेबी बम्प दिसत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्यामुळे रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा होणार, या चर्चेला उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित आणि रितिकाचा व्हायरल झालेल्या या व्हीडिओमध्ये रितिका आणि रोहित एअरपोर्ट जात असल्याचे दिसत आहे. रितिकाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि डेनिम जॅकेट घातले होते. तर दरम्यान रितिका मागे वळून तिच्याबरोबर असलेल्या सर्वांबरोबर गप्पा मारतानाही दिसली. त्यानंतर पुढे जात असताना रितिकाचा बेबी बम्प दिसल्याचे या व्हीडिओमध्ये दिसून आले. हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हीडिओला ज्युनियर शर्मा लवकरच येत आहे… असं कॅप्शनही दिलं आहे.

हेही वाचा – Rohit Sharma on Mohammed Shami: “शमीला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणं शक्य नाही…”, रोहित शर्माने मोहम्मद शमीबद्दल केलं मोठं वक्तव्य, कर्णधार नेमकं काय म्हणाला?

रोहित शर्मा पुन्हा बाबा होणार या चर्चेला हल्लीच आलेल्या एका रिपोर्टमुळे दुजोरा मिळाला. भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेनंतर भारताला ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर बॉर्डर गावसकर ट्रॉफीअंतर्गत पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरू होण्यापूर्वीच रोहित शर्मा एक सामना खेळणार नसल्याचे समोर आले होते. वास्तविक, कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या किंवा दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – PAK vs ENG: बाबर आझमला डच्चू देऊन पदार्पणाची संधी मिळालेल्या कामरानने झळकावलं शतक

“पीटीआयशी बोलताना बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, वैयक्तिक कारणांमुळे मालिकेतील पहिला किंवा दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी तो उपलब्ध नसल्याचे रोहितने बीसीसीआयला सांगितले आहे. याबाबत अजूनतरी काही निश्चित माहिती मिळालेली नाही. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वी जर रोहितचे वैयक्तिक काम आटपले तर तो पाचही कसोटी खेळू शकतो. येत्या काही दिवसांत याबाबत स्पष्ट माहिती मिळेल.”, अशी माहिती पीटीआयने दिली होती.

हेही वाचा – Rohit Sharma on Bumarh: “त्याने फार वेळा संघाचे नेतृत्त्व केलेले नाही…”, रोहित शर्मा जसप्रीत बुमराहला उपकर्णधार पदाची जबाबदारी दिल्याबाबत पाहा काय म्हणाला?

या बातमीनंतर रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी ऑस्ट्रेलियाविरूद्धचा कसोटी सामना खेळणार नसल्याची चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे. रोहित आणि रितिकाला यापूर्वीच एक मुलगी आहे. जिचं नाव समायरा शर्मा आहे. समायराचा जन्म २०१८ मध्ये मुंबईत झाला होता. त्यावेळेसही रोहित शर्मा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळत होता आणि त्याला त्याच्या लेकीच्या जन्मासाठी भारतात परत येता आले नव्हते. पण रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांनी दुसऱ्या मुलाच्या जन्माबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma wife ritika sajdeh viral video of baby bump rumors of rohit ritika expecting second child bdg