Rohit Sharma Will Faint in South Africa 2027 World Cup: भारतीय संघाचे स्टार खेळाडू असलेले विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-२० विश्वचषकानंतर टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. पण हे दोघेही कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळताना दिसणार आहेत. श्रीलंकाविरूद्धच्या एकदिलसीय मालिकेत हे दोन्ही खेळाडू संघाचा भाग आहेत. पण यादरम्यानच भारताचे माजी खेळाडू कृष्णमचारी श्रीकांत यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या २०२७ चा विश्वचषक खेळण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

हेही वाचा – Jasprit Bumrah: “सर्वजण एकत्र होतो अन् त्याला…” हार्दिकची हुर्याे उडवली जात असताना MI संघात कसं वातावरण होतं? बुमराहचं मोठं वक्तव्य

PAK vs BAN Test Series Yasir Arafat on PCB
PAK vs BAN : पीसीबी म्हणजे एक सर्कस, त्यात अनेक जोकर भरलेत; माजी खेळाडूची कठोर शब्दात टीका
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
Babar Azam Retirement From Test Cricket Fake Post Goes Viral on Social Media
PAK vs BAN: पाकिस्तानच्या पराभवानंतर बाबर आझमने कसोटीमधून घेतली निवृत्ती? व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Zaheer Khan has been appointed as the mentor
Zaheer Khan : झहीर गुरुजी देणार लखनौला शिकवणी; गौतम गंभीरच्या जागी नियुक्ती
PAK vs BAN Ahmad Shahzad Slams PCB For Pakistan Defeat Against Bangladesh
PAK vs BAN: “माझ्या आयुष्यात पाकिस्तान क्रिकेट इतके खालच्या पातळीवर…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूने PCBला सुनावलं
Kamran Akmal on PAK vs BAN Test
PAK vs BAN : ‘जागतिक स्तरावर पाकिस्तान क्रिकेट चेष्टेचा विषय…’, कामरान अकमलची सडकून टीका; म्हणाला, क्लब क्रिकेटर्स पण…
Australia Mitchell Starc Statement on the Border Gavaskar Trophy sport news
अॅशेसइतकेच महत्त्व! बॉर्डर-गावस्कर करंडकाबाबत ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कचे विधान

एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्मावर एक मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त विद्यमाने खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक गंभीर म्हणाले की, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी फिटनेस आणि फॉर्म कायम ठेवला तर ते आगामी स्पर्धेत देशासाठी सहभागी होऊ शकतात. गंभीरच्या या वक्तव्यानंतर ६४ वर्षीय श्रीकांत यांनी आपले मत मांडले आहे.

आपल्या यूट्यूब चॅनलवर मुलगा अनिरुद्धसोबत विशेष चर्चेदरम्यान माजी क्रिकेटपटू म्हणाले की, विराट कोहली विश्वचषकाचा भाग असू शकतो. पण रोहितच्या फिटनेसबद्दल त्यांना शंका आहे. कृष्णमचारी श्रीकांत म्हणाले, विराट कोहली चॅम्पियन खेळाडू आहे. रोहित शर्मा तेव्हा ४० वर्षांचा असेल. आपल्या चाळीशीत कोणी वर्ल्डकप खेळू शकत नाही. तो दक्षिण आफ्रिकेत तो बेहोश चक्कर येऊन पडेल.

हेही वाचा – IND vs SL Live Streaming: भारत-श्रीलंका मालिकेचे सामने लाइव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या योग्य चॅनेल व मोबाईल अ‍ॅप

रोहित शर्मावर माजी क्रिकेटरचे मोठे वक्तव्य

श्रीकांत रोहित शर्माबद्दल सांगताना म्हणाले, रोहित शर्मा एक चांगला खेळाडू आहे. पण आता त्याचं वय ३७ वर्ष आहे आणि पुढचा विश्वचषक तीन वर्षांनी आहे. तेव्हा रोहित शर्मा ४० वर्षांचा असेल. म्हणजेच रोहित जर धोनी किंवा विराट कोहलीइतका खूप जास्त फिट असेल तरच तो चाळीशीत वर्ल्डकप खेळू शकतो. पण विराट कोहली २०२७चा विश्वचषक खेळू शकतो, माझ्यामते तर तो नक्कीच खेळू शकतो. पण रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेत चक्कर येऊन पडेल.

गौतम गंभीरबद्दल बोलताना श्रीकांत म्हणाले, गौतम गंभीरने आता यु-टर्न घेतला आहे. टी-२० वर्ल्डकप २०२४ पूर्वी गंभीर म्हणत होता, जर विराट-रोहितने चांगली कामगिरी केली नाही तर त्यांचा संघात समावेश होणार नाही. पण आता त्याने यु-टर्न घेत म्हणाला, विराट आणि रोहितसारखा खेळाडूच नाहीय. मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर गंभीर म्हणाला, दोघांनाही अजून खूप क्रिकेट खेळायचे आहे आणि जर ते २०२७ च्या वर्ल्डकपपर्यंत फिट असतील.

हेही वाचा – Olympics 2024: भारताच्या लेकींनी केली कमाल, तिरंदाजीत पहिल्या पदकाच्या दिशेने आश्वासक पाऊल, आता थेट…

विराट कोहलीने संघाचा भाग असताना त्याच्या कारकिर्दीत वनडे वर्ल्डकप वगळता आयसीसीच्या सर्व ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यामुळे विराटच्या या आयसीसी ट्रॉफीच्या यादीत ही एकमेव ट्रॉफीची जागा रिकामी आहे. तर रोहित शर्मासाठी वर्ल्डकप जिंकणं म्हणजे वनडे वर्ल्डकपची ट्रॉफी आहे, असं त्याने अनेकदा सांगितलं आहे. त्यामुळे हे दोन्ही दिग्गज खेळाडू २०२७ चा विश्वचषक खेळणार का यावर सर्वांच्या नजरा असणार.