Rohit Sharma will have 3 big records:भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी मालिकेतील शेवटची कसोटी अहमदाबाद येथे खेळवली जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा मालिकेतील निर्णायक सामना आहे. डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला इतिहास रचण्याची संधी आहे. ५६ धावा करताच तो ३ मोठे विक्रम आपल्या नावावर करेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबादमध्ये रोहित शर्मा आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १७,००० धावा पूर्ण करू शकतो. रोहितकडे कर्णधार म्हणून ३००० धावा आणि कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर २००० धावा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आहे. हा कारनामा करण्यासाठी त्याला फक्त ५६ धावांची गरज आहे.
रोहितला ३ मोठे विक्रम करण्यासाठी इतक्या धावांची गरज –
रोहित शर्मा अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७ हजार धावा पूर्ण करू शकतो. त्याला ५६ धावांची गरज आहे. याशिवाय रोहित कर्णधार म्हणून ३ हजार धावा पूर्ण करू शकतो. यासाठी त्याला २१ धावा कराव्या लागतील. दुसरीकडे, रोहित भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये २ हजार धावा पूर्ण करू शकतो. यासाठी त्याला ३३ धावांची गरज आहे.
हेही वाचा – IPL 2023: शार्दुल ठाकूरनंतर ‘या’ धडाकेबाज खेळाडूने केले लग्न; RCBचे वाढले टेन्शन!
ही कसोटी भारतासाठी खूप महत्वाची –
हा सामना भारतासाठी खूप महत्वाचा आहे. अहमदाबादमध्ये, कांगारूवर मात करुन टीम इंडिया मालिका ३-१ अशी जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात धडक मारण्याचा प्रयत्न करेल. असे झाले तर भारत दोनदा अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरेल. जर या सामन्यात भारत पराभूत झाला किंवा सामना अनिर्णात राहिला, तर टीम इंडियाला श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड मालिकेवर अवलंबून राहावे लागेल.
सामन्याबद्दल बोलायचे तर, ऑस्ट्रेलियाने ६१.१ षटकानंतर ३ बाद १६० धावा केल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर उस्मान ख्वाजा (६७) आणि पीटर हँड्सकॉम्ब(९) खेळत आहेत. भारताकडून आश्विन, जडेजा आणि शमीने प्रत्येकी १ विकेट घेतली आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि उमेश यादव</p>
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुहनेमन