India Tour of West Indies: WTC अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू सध्या विश्रांतीवर आहेत. यानंतर, संघ जुलैमध्ये वेस्ट इंडिजचा दौरा करेल आणि त्यानंतर संघाला सलग सामने खेळावे लागतील. वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात १२ जुलैपासून कसोटी सामन्याने होईल, तर शेवटचा सामना १३ ऑगस्टला टी२० फॉरमॅटमध्ये होणार आहे. या दौऱ्यावर टीम इंडियाला नवा कर्णधार मिळू शकतो. कर्णधार रोहित शर्माला विश्रांती दिली जाऊ शकते. अगदी हार्दिक पांड्याकडेही संघाची जबाबदारी सोपवली जाणार नसल्याच्या बातम्या येत आहेत.

वेस्ट इंडीज दौऱ्यावर रोहित शर्मा नसणार संघाचा कर्णधार?

वेस्ट इंडिजचा दौऱ्यावर भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करताना कदाचित दिसणार नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या दौऱ्यातील काही सामन्यांसाठी रोहितला विश्रांती दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे, रोहित शर्मा इंडियन प्रीमियर लीग २०२३मध्ये आणि त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये थकलेला दिसत होता, त्यानंतर त्याच्याबाबत हा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, रोहितशी बोलल्यानंतरच निवडकर्ते कोणताही निर्णय घेतील, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.

Virat Kohli and Rohit Sharma arrived in Chennai
IND vs BAN : कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया चेन्नईत दाखल, विराट-रोहितचा विमानतळावरील VIDEO व्हायरल
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
AUS vs SCO Australia Team video viral with interesting Trophy
२६००० किमीचा प्रवास करुन ऑस्ट्रेलियाला मिळालं वाडगं; चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रियेने वेधलं लक्ष
IND vs BAN Test Series updates in marathi
IND vs BAN : भारत दौऱ्यासाठी बांगलादेशचा कसोटी संघ जाहीर! हत्येचा आरोप असणारा खेळाडू संघात कायम
AFG vs NZ Test Match at Greater Noida Stadium Catering Using Washroom Water For Food
AFG vs NZ: टॉयलेटमध्ये धुतली भांडी; नोएडात आदरातिथ्याची लक्तरं; AFG vs NZ सामना होत असलेल्या स्टेडियमधील संतापजनक घटना
Afghanistan Cricket Team Is Very Unhappy With Facilities Of Greater Noida Stadium
AFG vs NZ: “आम्ही इथे कधीच परत येणार नाही…”, ग्रेटर नोएडा स्टेडियमच्या गैरव्यवस्थापनावर अफगाणिस्तान संघ संतापला, नेमकं काय घडलं?
IND vs BAN Team India squad announced for 1st match against bangladesh
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर! यश दयालसह ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
Rahul Dravid son Samit included in team india
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, राहुल द्रविडच्या मुलाला मिळाली संधी

हेही वाचा: Cricket Record: W, W, W, W, W, W; क्रिकेट इतिहासातला मोठा विक्रम! ‘या’ खेळाडूने घेतल्या एकाच षटकात सहा विकेट्स

‘या’ खेळाडूच्या खांद्यावर संघाची जबाबदारी टाकली जाऊ शकते

टाईम्सच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते की, जर रोहित शर्मा कर्णधार नसेल तर या दौऱ्यावर अजिंक्य रहाणेकडे संघाचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. त्याचबरोबर हार्दिक पांड्याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. माहितीसाठी! रहाणेने आयपीएल २०२३ मध्ये अफलातून फलंदाजी करून भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवले होते, त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पहिल्या डावात ८९ धावांची खेळी खेळून सामना जिंकण्याच्या आशा कायम ठेवल्या होत्या. तसेच, दुसऱ्या डावात त्याच्या त्याने ४३ धावा केल्या होत्या.

रोहित खराब फॉर्मशी झुंजत आहे

आयपीएल २०२३च्या १६ सामन्यांमध्ये रोहित शर्मा २०.७५च्या सरासरीने केवळ ३३२ धावा करू शकला. यादरम्यान त्याने फक्त दोन अर्धशतके झळकली. त्याच वेळी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात रोहितला केवळ १५ आणि ४३ धावा करता आल्या. वृत्तानुसार, वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत रोहित शर्माच्या जागी अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा कर्णधार असेल. रहाणे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून तब्बल १८ महिन्यांनंतर टीम इंडियामध्ये परतला.

हेही वाचा: Rishabh Pant Health Update: वर्ल्डकपआधी टीम इंडियासाठी गुडन्यूज! ऋषभ पंत आधाराशिवाय चढला जिना, पाहा Video

संघ अजून जाहीर झाला नाही

भारतीय संघ १२ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळण्यास सुरुवात करणार आहे. यादरम्यान २ कसोटी, ३ वन डे आणि ५ टी२० सामने खेळवले जातील. अद्याप या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झालेला नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील पराभवानंतर ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे. कारण, यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे असणार आहे.