जगभरातील खेळाडू गेल्या काही काळात आपल्या खेळाबरोबरच सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत असतात. आणि या प्रकाराला भारतीय क्रिकेट खेळाडूही अपवाद नाहीत. भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली पासून अगदी कालपरवा संघात भरती झालेल्या ऋषभ पंत पर्यंत बहुतांश खेळाडू बिनधास्तपणे सोशल मीडियावर व्यक्त होतात. परंतु कधीकधी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे काही गंमती-जमती देखील घडतात. असाच एक प्रकार युझवेंद्र चहलच्या बाबतीत घडला आहे.

अवश्य वाचा – प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल.. पाहा भारत वि. जपान सामन्याची चित्रमय झलक

अवश्य वाचा – हे कलाकार साकारणार ’83’ च्या विजयाचे शिल्पकार

भारतीय संघातील आक्रमक फलंदाज रोहित शर्माने फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलचा एक शर्टलेस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. “आज पाहिलेले सर्वोत्कृष्ट छायाचित्र. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला हरवून मालिका जिंकली. परंतु आणखी कोणी एक आहे ज्याने खऱ्या हेडलाईन्स मिळवल्या.” अशा आशयाची पोस्ट लिहून रोहितने चहलचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये चहलच्या शेजारी WWE सुपरस्टार ‘द रॉक’ उर्फ ड्वेन जॉन्सन दिसत आहे. केवळ गंमत म्हणून पोस्ट केलेला हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही नेटकऱ्यांनी तर चहलची खिल्ली उडवून त्याला ट्रोल देखील केले आहे.

काय म्हणाले नेटकरी?

शतकवीर ‘हिटमॅन’ची कर्णधार विराटशी बरोबरी

भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्माने नवीन वर्षात आपलं पहिलं-वहिलं शतक झळकावलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात रोहितने कांगारुंच्या गोलंदाजांचा समाचार घेत, आपल्या वन-डे कारकिर्दीतल्या २९ व्या शतकाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या २८७ धावांचा पाठलाग करताना रोहितने सर्वात आधी लोकेश राहुल आणि त्यानंतर विराट कोहलीसोबत महत्वपूर्ण भागीदारी केली.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे क्रिकेटमधलं रोहितचं हे आठवं शतक ठरलं. या शतकी खेळीसह रोहितने विराटशी बरोबरी केली आहे. या दोन फलंदाजांव्यतिरीक्त सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ शतकं झळकावली आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. रोहित शर्माने अवघ्या ४ धावा काढत वन-डे क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.

Story img Loader