भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सोशल मीडिया अकाऊंटवर एकमेकांची मजा-मस्करी करत असतात. अनेकदा केदार जाधव, रोहित शर्मा, युजवेंद्र चहल हे खेळाडू अशा थट्टा-मस्कीरमध्ये नेहमी आघाडीवर असतात. वेस्ट इंडिजविरुद्ध वन-डे मालिकेसाठी सज्ज होत असलेला केदार जाधव सध्या रोहित शर्माचा बळी ठरतोय.
केदार जाधवने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर, जॅकेट घातलेला पारंपरिक वेषातला एक फोटो टाकला. साहजिकच या फोटोवर केदारच्या चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं.
मात्र रोहित शर्माने पुन्हा एकदा भन्नाट कमेंट करत, केदारची मस्करी करण्याचा प्रयत्न केला आहे. इतकच नव्हे फिरकीपटू युजवेंद्र चहलनेही रोहितची साथ देत केदारला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
टी-२० मालिकेत दोन्ही संघ सध्या १-१ अशा बरोबरीत आहेत. त्यामुळे ११ तारखेला मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणाऱ्या सामन्यात विजय मिळवणं दोन्ही संघांसाठी अनिवार्य झालेलं आहे. १५ डिसेंबरपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ३ वन-डे सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत केदार जाधव खेळणार आहे.