Rohit Sharma Instagram Post: भारताचा कर्णधार रोहित शर्माने सोशल मिडियावर टीम इंडियामधील युवा सहकाऱ्यांसोबत एक नवीन फोटो पोस्ट केला आहे. शनिवारी धरमशाला येथे पाचवा कसोटी सामना एका डावाने जिंकत इंग्लंडवर ४-१ ने दणदणीत विजय मिळवल्यानंतर सोशल मीडियावरची हिटमॅनची ही पोस्ट व्हायरल झाली आहे, या फोटोवर रोहितने दिलेल्या कॅप्शने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित शर्मा धरमशाला कसोटीत तिसऱ्या दिवशी पाठदुखीच्या समस्येमुळे मैदानात उतरला नव्हता. पण या विजयानंतर रोहित शर्माने इंस्टाग्रामवर ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि सर्फराझ खान या युवा खेळाडूंसोबत शेअर केलेल्या फोटोला ‘गार्डनमध्ये फिरणारी मुलं’ (गार्डन में घुमनेवाले बंदे) असं कॅप्शन दिलं आहे. रोहितच्या या कॅप्शनलाही मोठा संदर्भ आहे.

रोहित शर्मा मैदानात असताना खेळाडूंना ज्या सूचना देत असतो किंवा त्यांच्याशी चर्चा करतो, तो आवाज स्टंप माईकमध्ये काही वेळेस रेकॉर्ड होतो आणि याचे बरेचसे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत. अशाच इंग्लंडविरूध्दच्या विशाखापट्टणम येथील मालिकेत रोहित शर्मा सर्वांना मैदानावर नीट आणि लक्षपूर्वक फिल्डींग करा आणि आपलं १०० टक्के द्या, असं आपल्या स्टाईलमध्ये सांगत होता. तेव्हा त्याने हे शब्द वापरले होते आणि नंतर आता तेच कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.

या मालिकेत रोमांचक क्रिकेट सामने पाहायला मिळालेच पण त्याचबरोबर स्टंप मायक्रोफोनद्वारे रेकॉर्ड झालेल्या रोहितच्या काही टिपण्ण्यांनीही सर्वांचे मनोरंजन केले आहे. “मी स्लिपमध्ये फिल्डिंगसाठी उभा असतो कारण तिथून मला सामन्यावर नियंत्रण ठेवणे आणि माझ्या खेळाडूंशी बोलणे सोपे जाते. मी स्टंपच्या जवळ असल्याने, माझ्या टिपण्ण्या माईकद्वारे रेकॉर्ड होतात.” अलीकडेच धर्मशाला कसोटीपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान रोहित म्हणाला.

भारताने नयनरम्य अशा धरमशालामधील एचपीसीए स्टेडियमवर खेळवण्यात आलेला पाचवा कसोटी सामना तीन दिवसांतच गुंडाळला. पाचव्या कसोटीत इंग्लंडचा पराभव करून एक डाव आणि ६४ धावांनी विजय मिळवला आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत आपले स्थान निश्चित केले.

विराट कोहली, केएल राहुल आणि मोहम्मद शमी यांच्यासारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत यजमानांनी इंग्लंडच्या बॅझबॉलची हवा काढली. हैदराबादमधील पहिली कसोटी गमावल्यानंतर रोहितने युवा संघाला मालिका जिंकण्यासाठी आणि उत्तम कामगिरी करण्यासाठी पाठींबा आणि बळ दिले. भारताने या मालिकेत सर्फराझ खाव, ध्रुव जुरेल, रजत पाटीदार, देवदत्त पडिक्कल आणि आकाश दीप अशा पाच खेळाडूंनी पदार्पण केले.

युवा डावखुरा फलंदाज जैस्वालने मालिकेत ८९च्या सरासरीने ७१२ धावा करत अनेक विक्रम मोडीत काढले सोबतच त्याला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. पहिल्या दोन कसोटीत खराब खेळीनंतर रोहितने नऊ डावांत ४०० धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharmas garden mein ghoomne wale bande instagram post with young batters went viral after ind vs eng dharamsala win bdg
Show comments