Rohit Jumps into Water to Save Wife’s Phone: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या कामगिरीसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतो. अलीकडेच, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील पराभवानंतर रोहितला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर रोहित आता कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. पत्नी रितिका सजदेहसोबत तो फिरायला गेला होता. याच्याशी संबंधित एक रंजक गोष्ट समोर आली आहे. रितिकाचा फोन वाचवण्यासाठी रोहितने पाण्यात उडी मारली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वास्तविक रितिकाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. इंस्टा स्टोरीमध्ये रोहितचा व्हिडीओ शेअर करण्यासोबतच तिने लिहिले की, ‘माझा फोन वाचवण्यासाठी या व्यक्तीने पाण्यात उडी घेतली.’ रोहित-रितिकाच्या या स्टोरीवर विविध कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अनेक सोशल मीडिया यूजर्सनी प्रतिक्रिया देत आहेत. काही त्याचे कौतुक करत आहेत, तर काही त्याला ट्रोल करत आहेत.

रितिका सजदेहची इन्स्टाग्राम स्टोरी

विशेष म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर टीम इंडियाचे खेळाडू ब्रेकवर आहेत. भारतीय संघ जुलैमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दोन्ही संघांमध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. रोहितला कसोटी मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये त्याची कामगिरी निराशाजनक होती. या पराभवानंतर रोहितला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले.

हेही वाचा – MS Dhoni Brother: एमएस धोनी पहिल्यांदाच दिसला भावासोबत, सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल

सामन्याबद्दल बोलायचे, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४६९ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने प्रत्युत्तरात आपल्या पहिल्या डावात सर्वबाद २९६ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ८ बाद २७० धावांवर घोषित केला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने दोन्ही डावाच्या जोरावर भारतीय संघासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात २३४ धावांवर गारद झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharmas instagram story of jumping into water to save his wife ritikas phone went viral vbm