Rohit Sharma Airport Video Viral: भारताचा आयर्लंड दौरा संपला असून आता चाहत्यांच्या नजरा आशिया कपवर खिळल्या आहेत. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या यजमानपदी असलेल्या या स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. श्रीलंका जाण्यापूर्वी टीम इंडिया बंगळुरूमध्ये एकत्रित येणार आहे. मुंबईहून बंगळुरूला जाताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने चाहत्यांना खास संदेश दिला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रोहित शर्माने चाहत्यांना दिला खास संदेश –

रोहित शर्मा बुधवारी मुंबई विमानतळावर पोहोचला, तिथे पॅपाराझींनी त्याला घेरले. रोहितचा फोटो घेऊन एक पॅप म्हणाला, ‘सर आशिया कपची प्रतिक्षा आहेत.’ हे ऐकून रोहित हसायला लागला आणि म्हणाला, ‘जीतेंगे-जीतेंगे’. रोहित शर्माचा आत्मविश्वास पाहून चाहत्यांना आनंद झाला. रोहितचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ISRO successfully launches communication satellite NVS 02
‘इस्रो’चे शतकी उड्डाण
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Air India passengers create ruckus after got stranded in Mumbai-Dubai flight
Air Indiaच्या विमानात ५ तास अडकून पडले प्रवासी, खाली उतरवण्यासाठी घातला गोंधळ; व्हायरल होतोय Video
Accident
Accident News : उलटी करण्यासाठी खिडकीच्या बाहेर डोकावली आणि बाजूने जाणाऱ्या लॉरीनं…
Avinash Narkar And Aishwarya Narkar why constantly do reel videos
अविनाश-ऐश्वर्या नारकरांचा सतत Reel व्हिडीओ करण्यामागे आहे ‘हा’ हेतू, अभिनेते म्हणाले, “ज्या वेळेला आम्हाला…”
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “आपल्याला एन्ट्री आवडलीय…”, डॅडी पुष्पाकाकीच्या मदतीने सूर्याविरुद्ध पुन्हा कट करणार; पाहा, मालिकेतील ट्विस्ट….
Ranji Trophy 2025 Matches Live Streaming and Match Timings in Marathi
Ranji Trophy: रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी रोहित-विराट सज्ज, सामने कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार? जाणून घ्या वेळ
Rohit Sharma Dance Step on Wankhede Stadium Stage to Call Shreyas Iyer to Join Him Video Goes Viral
Rohit Sharma Video: रोहित शर्माचा ब्रेकडान्स, श्रेयस अय्यरला स्टेजवर बोलवण्यासाठी केली हटके डान्स स्टेप, वानखेडेच्या कार्यक्रमातील VIDEO व्हायरल

खेळाडूंना फिटनेस टेस्ट द्यावी लागणार –

भारताच्या विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठी रिंगणात असलेल्या १८ खेळाडूंची बंगळुरू येथील अलूर येथे फिटनेस आणि वैद्यकीय चाचण्या होतील. या आधारावर खेळाडूंचे संघातील स्थान निश्चित मानले जाईल. आयर्लंडमध्ये नुकतीच मालिका खेळलेल्या खेळाडूंव्यतिरिक्त, बहुतेक खेळाडूंना नियमित फिटनेस चाचणी देणे अनिवार्य आहे. खेळाडूंची रक्त तपासणीही होणार आहे.

अनेक खेळाडू रिहॅबमध्ये होते सहभागी –

भारतीय संघातील अनेक खेळाडू जखमी झाले होते, जे एनसीएमध्ये रिहॅबमध्ये होते. आशिया चषकात त्याचे पुनरागमन झाले असून त्यामुळे त्यांच्या विश्वचषकात खेळण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. निवडीपूर्वी केएल राहुल आणि अय्यर यांच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. हे दोन्ही खेळाडू अनुक्रमे मांडीच्या आणि पाठीच्या दुखण्यातून बरे होऊन पुनरागमन करत आहेत. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी अय्यरला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले असले, तरी राहुलच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह कायम आहे.

हेही वाचा – Virat Kohli: किंग कोहलीने पुन्हा एकदा ‘या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, VIDEO होतोय व्हायरल

आशिया चषकसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल (बॅकअप संजू सॅमसन), इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा.

Story img Loader