Rohit Sharma’s reaction to Team India selection for World Cup : भारतीय संघ प्रदीर्घ काळापासून खेळाडूंना सतत दुखापत होण्याच्या समस्येशी झगडत आहे, अशा परिस्थितीत आगामी आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या पुनरागमनबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दुखापतग्रस्त यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुल आणि श्रेयस अय्यर दोघेही पुनरागमनाच्या मार्गावर आहेत. रोहित शर्मा म्हणाला, या खेळाडूंची प्रतिक्षा करु आणि कशी कामगिरी करतात ते पाहू.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मुंबईतील एका कार्यक्रमात माध्यामांशी बोलताना म्हणाला, “कोणाचीही स्वयंचलित निवड नाही, अगदी मीही नाही. आमच्याकडे ही गोष्ट आहे, जिथे कोणालाही स्थानाची हमी दिली जात नाही. आम्ही हे सांगू शकत ‘शेवटी तुम्ही तिथे आहात’.” रोहित पुढे म्हणाला, “होय, काही खेळाडूंना माहित आहे की ते खेळणार आहेत. पण यावेळी, वेस्ट इंडिजमध्ये तीन एकदिवसीय सामने खेळणे, ही काही खेळाडूंना पाहण्याची एक चांगली संधी होती. आशिया चषकात, आम्हाला पुन्हा एकदा चांगल्या प्रतिस्पर्धेंचा सामना करावा लागेल.”

विश्वचषकापूर्वी आशिया चषक स्पर्धा होणार आहे. तत्पुर्वी रोहित शर्मा म्हणाला, “श्रेयस आणि केएल चार महिने काहीही खेळले नाहीत. मोठ्या दुखापती असल्याने दोघांचीही शस्त्रक्रिया झाली होती. मला माहीत आहे, मला एकदा शस्त्रक्रिया करावी लागली होती आणि त्यानंतर कसं वाटतं, ते. खूप कठीण आहे. ते कसा प्रतिसाद देता, काय करतात हे पाहावे लागेल.”

हेही वाचा – Cristiano Ronaldo: सलग तिसऱ्या वर्षी ख्रिस्तियानो रोनाल्डो ठरला इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा व्यक्ती

रोहित शर्मा म्हणाला, “निवड समितीची बैठक काही दिवसात होईल, आम्ही काय करू शकतो याबद्दल आमच्यात चांगली चर्चा होईल. परंतु, प्रामाणिकपणे सांगायचे तर कोणतीही स्वयंचलित निवड होणार नाही. सर्वांना जागांसाठी लढावे लागेल, प्रत्येकाला ते करावे लागेल. मग ते पहिले स्थान असो किंवा शेटचे स्थान. भारतीय कर्णधार पुढे म्हणाला, “आमच्याकडे बरीच नावे आहेत. विश्वचषकात जाण्यासाठी आमच्यासाठी योग्य संयोजन काय आहे, ते आम्ही आशिया चषकापूर्वी पाहू.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharmas reaction to team india selection and the return of kl rahul and shreyas iyer vbm