World Cup 2023, Rohit Sharma: विश्वचषक २०२३चा उत्साह शिगेला पोहचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिले तीन सामने जिंकले आहेत. त्यांचा पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध पुण्यात १९ ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्यात आणि संपूर्ण विश्वचषकात रोहित आपल्या नावावर एक खास विक्रम करू शकतो. ज्या वेगाने तो फलंदाजी करत आहे, त्यामुळे तो हा विक्रम मोडण्यात यशस्वी होईल, अशी आशा आहे. वास्तविक, कर्णधार म्हणून विश्वचषकाच्या एकाच मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा भारतीय खेळाडूचा हा विक्रम आहे. या बाबतीत महेंद्रसिंग धोनीचा विक्रम रोहितच्या सर्वात जवळ आहे. कर्णधार म्हणून रोहितचा हा पहिलाच एकदिवसीय विश्वचषक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३६ वर्षीय रोहितने या विश्वचषकात आतापर्यंत तीन डावात ७२च्या सरासरीने २१७ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. तो सध्या २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. धोनीने २०११च्या विश्वचषकात २४१ धावा आणि २०१५च्या विश्वचषकात २३७ धावा केल्या होत्या. २५ धावा करताच रोहित धोनीचा विक्रम मोडेल. त्याचबरोबर कपिल देव, विराट कोहली आणि सौरव गांगुली यांचे रेकॉर्डही रोहितच्या निशाण्यावर असतील.

१९८३च्या विश्वचषकात भारतीय संघाला चॅम्पियन बनवणारा कर्णधार कपिल देव याने या स्पर्धेत ३०३ धावा केल्या होत्या. त्याचा विक्रम मागे ठेवण्यासाठी रोहितला ८७ धावांची गरज आहे. त्याचवेळी विराट कोहलीने २०१९ विश्वचषकात पाच अर्धशतकांच्या मदतीने ४४३ धावा केल्या होत्या. या यादीत सौरव गांगुली पहिल्या क्रमांकावर आहे. २००३च्या विश्वचषकात टीम इंडियाचे कर्णधार असताना त्याने तीन शतकांच्या मदतीने ४६५ धावा केल्या होत्या. या दोघांशिवाय कोणत्याही भारतीय कर्णधाराला विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत ४०० पेक्षा जास्त धावा करता आलेल्या नाहीत.

हेही वाचा: World Cup 2023: कर्णधार रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर रिकी पाँटिंगचे मोठे विधान; म्हणाला, “भारत अपेक्षांच्या दबावाखाली…”

गांगुलीचा विक्रम मोडण्यासाठी रोहितला २४९ धावांची गरज आहे. मात्र, त्याचा फॉर्म पाहता तो हे विक्रम मोडेल असे वाटते. रोहितचे सध्या साखळी फेरीत सहा सामने बाकी आहेत. जर टीम इंडिया उपांत्य फेरीत आणि नंतर अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरली तर रोहित आठ सामने खेळेल. हिटमेनचा हा तिसरा एकदिवसीय विश्वचषक आहे. याआधी तो २०१५ आणि २०१९ विश्वचषकही खेळला होता.

विश्वचषकातील २० सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ११९५ धावा आहेत. भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकरने वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक २२७८ धावा केल्या आहेत. रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या स्थानावर विराट कोहली असून त्याने २९ विश्वचषक सामन्यांमध्ये ११८६ धावा केल्या आहेत.

हेही वाचा: World Cup 2023: “भाऊ स्विगीला ऑर्डर द्या मला…”, सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावरील ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर

रोहितने २०१५ विश्वचषक स्पर्धेत आठ सामन्यांत ४७.१४च्या सरासरीने ३३० धावा केल्या होत्या. यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, रोहित २०१९च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने नऊ सामन्यांमध्ये ८१च्या सरासरीने ६४८ धावा केल्या. यामध्ये पाच शतकांचा समावेश आहे. रोहितच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने २५४ सामन्यांच्या २४६ डावांमध्ये ४९.१९च्या सरासरीने १०,३२९ धावा केल्या आहेत. यामध्ये ३१ शतके आणि ५३ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा रोहित हा एकमेव फलंदाज आहे.

एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू
खेळाडूडावधावासर्वोत्तम धावसंख्यासरासरीशतकेअर्धशतके
सचिन तेंडुलकर४४२२७८१५२५६.९५१५
रोहित शर्मा२०११९५*१४०६६.३८
विराट कोहली२९११८६*१०७४९.४१
सौरव गांगुली२११००६१८३५५.८८
राहुल द्रविड२१८६०१४५६१.४२
एकदिवसीय विश्वचषकात कर्णधार म्हणून एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा भारतीय
खेळाडूडावधावासर्वोत्तम धावसंख्याशतकेअर्धशतकेवर्ष
सौरव गांगुली११४६५११२*२००३
विराट कोहली४४३८२२०१९
मोहम्मद अझरूद्दीन३३२९३१९९२
कपिल देव३०३१७५*१९८३
एम.एस. धोनी२४१९१*२०११
एम.एस. धोनी२३७८५*२०१५
रोहित शर्मा२१७१३१२०२३
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit targets a special record of ganguly in the world cup can leave dhoni behind against bangladesh avw
Show comments