Team India on T20 series against South Africa: दक्षिण आफ्रिका हा २०२३ या वर्षातील भारतीय क्रिकेट संघाचा शेवटचा परदेशी दौरा असेल. जिथे टीम इंडियाला टी-२० मालिकेसह एकदिवसीय आणि कसोटी मालिका देखील खेळायची आहे. पुढील आठवड्यात या दौऱ्यातील टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयच्या निवड समितीला १० डिसेंबरला होणाऱ्या टी-२० मालिकेपूर्वी आणि नंतर दोन मोठे निर्णय घ्यायचे आहेत. जे विराट कोहली आणि रोहित शर्माच्या टी-२० पुनरागमनाबाबत असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इनसाइड स्पोर्ट्सच्या माहितीनुसार, “आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी संघांची घोषणा एकाच वेळी केली जाईल. मात्र, भारत अ मालिकेपर्यंत कसोटी संघाची घोषणा रोखण्यात येणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी परतणार आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी इंडिया ‘अ’ संघातील काही खेळाडूंबाबतही निर्णय निवडकर्ते घेतील.

हेही वाचा: Hasan Ali: “मला आयपीएल…”, पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हसन अलीचे मोठे विधान

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टला सांगितले की, “संघ निवडीबाबत सोमवारी चर्चा करण्यात येईल. या चर्चेदरम्यान अनेक गोष्टी आहेत पण कसोटीपूर्वी आम्ही टी-२० आणि एकदिवसीय खेळणार आहोत, त्यामुळे संघ निवड ही त्याच्या आसपास करण्यात येईल. त्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या टी-२० मधील निवडीबाबतही चर्चा केली जाणार आहे.”

रोहित-विराट टी-२० मध्ये पुनरागमन करणार का?

टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांवर लक्ष केंद्रित केल्यास दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना दीर्घ विश्रांती मिळू शकते. अशावेळी दोघेही कसोटी मालिकेसाठीच संघात सामील होतील. विराट आणि रोहित हे दोघेही गेल्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकापासून एकही टी-२० सामना खेळलेले नाहीत. ते दोघेही टी-२० संघाबाहेर आहेत कारण त्यांनी सर्व लक्ष वन डेकडे वळवले होते. मात्र, हे चालूच राहण्याची शक्यता आहे कारण जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी निवड समितीकडे फक्त सहा टी-२० सामने शिल्लक आहेत.

हेही वाचा: IND vs AUS: सूर्यकुमार यादवला इतिहास रचण्याची संधी, ६० धावा करताच त्याच्या नावावर होणार ‘या’ विक्रमाची नोंद

दरम्यान, अजित आगरकर विराट-रोहितबरोबर बसून त्यांच्या टी-२० भवितव्याबाबत निर्णय घेतील. जरी दोघेही कसोटीत खेळणार हे निश्‍चित असले तरी रोहित शर्मा वन डे खेळणे सुरू ठेवणार की नाही यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वर लक्ष केंद्रित करताना विराट कोहली वनडे मध्ये राहू शकतो पण तरीही हा चर्चेचा विषय आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit virat will make a comeback in t20 team india for africa tour will be announced next week avw
Show comments