Natasha Stankovic Shared photos on Instagram with Hardik Pandya: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाचा कसोटी आणि वनडे संघ जाहीर केला आहे. या दौऱ्यात वनडे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्यावर सोपवली आहे. या दौऱ्यालला जुलै महिन्यात सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकने इन्स्टावर शेअर केले फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
नताशा स्टॅनकोविकने पती हार्दिक पांड्यासोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नताशा आणि हार्दिक खूप रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच सोफ्यावर पोज देताना आणि एकमेकांच्या जवळ जाताना दिसत आहेत. पहिल्या फोटोमध्ये हार्दिक आणि नताशा एकमेकांना किस करताना दिसत आहेत.
याशिवाय शेवटच्या फोटोमध्ये दोघेही हसताना दिसत आहेत. हार्दिकने काळ्या रंगाचा शर्ट आणि तपकिरी रंगाची पँट परिधान केली आहे, तर नताशाने झेब्रा-प्रिंटचा काळा आणि पांढरा ड्रेस घातला आहे. नताशाने फोटोंच्या कॅप्शनमध्ये फ्रेंचमध्ये एक वाक्य लिहिले आहे. इंग्रजीत याचा अर्थ आय लव्ह यू आहे. यानंतर, लाल हार्ट इमोजी देखील पोस्ट करण्यात आला असून हार्दिकला टॅग केले आहे.
हेही वाचा – Ashapura Mata Temple: रवींद्र जडेजाने पत्नी रिवाबासह आशापुरा मातेचे घेतले दर्शन, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
युजर्सनी हार्दिक आणि नताशाला केले ट्रोल –
नताशाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चाहते त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही चाहत्यांनी फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करून फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या, तर एका मोठ्या वर्गाने या जोडप्याला मजेदार कमेंट्स देऊन ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका युजरने लिहिले की, ‘लाज नावाची गोष्ट आहे का.’
हार्दिक पांड्याची वहिनी आणि कृणाल पंड्याची पत्नी पंखुरी शर्मानेही दोघांच्या फोटोंवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पंखुरीने फायर इमोजी पोस्ट केला. नताशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नताशा स्टॅनकोविकने २०२० मध्ये हार्दिक पांड्यासोबत लग्न केले. दोघांना अगस्त्य नावाचा एक मुलगा आहे.