‘‘रौनक पंडित माझे पती आणि प्रशिक्षक आहेत. गेली तीन वर्ष मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळते आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून त्यांना सहभागी करून घ्यावे अशी विनंती मी राष्ट्रीय नेमबाजी संघटनेला केली होती. मात्र मला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आयत्या वेळी रौनकला भारतीय पथकातून वगळल्याचे मला सांगण्यात आले. मात्र त्याचवेळी काही खेळाडूंच्या नातेवाईकांना विशेष पात्रता नसताना भारतीय चमूत सामील करण्यात आले. न्याय सगळ्यांसाठी समान हवा. माझी विनंती नाकारण्यात आली याचे वाईट वाटले नाही. मात्र व्यक्तीपरत्वे भूमिका बदलते हे निराशाजनक आहे, ’’असे मत अव्वल नेमबाज हिना सिद्धूने व्यक्त केले. ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टतर्फे आयोजित कार्यक्रमात ती बोलत होती.
ती पुढे म्हणाली, ‘‘रौनक माझे पती आहेत म्हणून त्यांना सहभागी करावे अशी माझी भूमिका नव्हती. कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केल्याने इन्चॉन येथील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी रौनकला अधिस्वीकृती पत्र मिळाले. मात्र अधिकृतरीत्या भारतीय चमूचा भाग नसल्याने निवास-प्रवासाचा खर्च त्यांना करावा लागला. सुदैवाने त्यांनी हा खर्च पेलत मला मार्गदर्शन केले आणि त्यामुळेच मला सांघिक प्रकारात पदक मिळू शकले. प्रत्येक खेळाडूची मागणी पूर्ण करता येऊ शकत नाही कारण संयोजकांच्याही मर्यादा असतात, परंतु याविषयी आधीच स्पष्ट आणि पारदर्शक भूमिका घेतल्यास खेळाडूंना फायदा होऊ शकतो.’’
जागतिक क्रमवारीत पिस्तूल क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त केल्यानंतर हिनाच्या कामगिरीत घसरण झाली आहे. त्याविषयी विचारले असता ती म्हणाली, ‘‘काही तांत्रिक गोष्टी कारणीभूत आहेत. स्पेन येथील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आटोपून आम्ही काही तासांत इन्चॉनला पोहचलो. आमच्या लढती लगेचच होत्या. खराब कामगिरीसाठी ही सबब नाही, मात्र नेमबाजी एकाग्रतेचा खेळ आहे. वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे.’’
रौनकला भारतीय चमूत सहभागी करून घ्यायला हवे होते -हिना सिद्धू
‘‘रौनक पंडित माझे पती आणि प्रशिक्षक आहेत. गेली तीन वर्ष मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळते आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून त्यांना सहभागी करून घ्यावे अशी विनंती मी राष्ट्रीय नेमबाजी संघटनेला केली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-10-2014 at 01:48 IST
TOPICSहिना सिधू
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ronak pandit should be involved in the indian team says heena sidhu