लिओनेल मेस्सी व जोस मॉरिन्हो यांना आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचा (फिफा) सवरेत्कृष्ट खेळाडू व प्रशिक्षकाचा पुरस्कार द्यावा, अशी शिफारस ब्राझीलचा अव्वल फुटबॉलपटू रोनाल्डो याने केली आहे.रोनाल्डो याने तीन वेळा फिफाचा सवरेत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळविला आहे. रिअल माद्रिदचा हुकुमी खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्यापेक्षा मेस्सी हाच श्रेष्ठ खेळाडू आहे, असेही ब्राझीलच्या रोनाल्डोने म्हटले आहे. त्याने पुढे म्हटले आहे, मी तर मेस्सीला मत देणार आहे. ख्रिस्तियानो हा तांत्रिकदृष्टय़ा व शैलीदार खेळाडू असला तरी मेस्सी हा त्याच्यापेक्षा अधिक भरवशाचा खेळाडू आहे.
फिफातर्फे ७ जानेवारी रोजी सवरेत्कृष्ट खेळाडू व प्रशिक्षकाची घोषणा केली जाणार आहे. त्याकरिता विविध देशांमधील कर्णधार आपले मत देतात.     

Story img Loader