मर्सिडीझ संघाच्या निको रोसबर्गने आपला ३०वा वाढदिवस ऑस्ट्रियन ग्रां.प्रि. शर्यतीच्या जेतेपदासह साजरा केला. संघसहकारी लुइस हॅमिल्टनला मागे टाकत यंदाच्या हंगामातील तिसऱ्या तर कारकीर्दीतील अकराव्या जेतेपदाची कमाई केली. ऑस्ट्रियन ग्रां.प्रि.सह हॅमिल्टनचे १६९ तर रोसबर्गचे १५९ गुण झाले आहेत. फेलीपे मासाने सेबॅस्टियिन वेटेल, फिन व्हाल्टेरी बोट्टास आणि निको हल्केनबर्ग यांना मागे टाकत तिसरे स्थान मिळवले.
पोल पोझिशनपासून शर्यतीची सुरुवात करणाऱ्या रोसबर्गने झटपट आघाडी घेतली. मात्र फर्नाडो अलोन्सो आणि किमी रेइकॉइन यांच्या गाडय़ांमध्ये टक्कर झाली. अपघात गंभीर असल्याने सुरक्षा वाहनाला पाचारण करावे लागले. सुदैवाने या अपघातात अलोन्सो किंवा रेइकॉइन दोघांनाही दुखापत झाली नाही, मात्र त्यांच्या गाडय़ांचे प्रचंड नुकसान झाले.

Story img Loader