जागतिक अजिंक्यपदाच्या शर्यतीत आघाडीवर असणाऱ्या निको रोसबर्गने बेल्जियम ग्रां.प्रि. शर्यतीत सहकारी लुइस हॅमिल्टनला मागे टाकत पोल पोझिशन मिळवली. यंदाच्या हंगामातील रोसबर्गची ही सलग चौथी पोल पोझिशन आहे. लहरी आणि फसव्या वातावरणात झालेल्या सराव शर्यतीत २९ वर्षीय रोसबर्गने सर्वात जलद लॅप पूर्ण करत यंदाच्या वर्षांतील सातवी तर कारकिर्दीतील अकराव्या पोल पोझिशन पटकावली. मर्सिडीझ संघातील सहकारी हॅमिल्टनने दुसरे तर रेड बुलच्या सेबॅस्टियन वेटेलने तिसरे स्थान मिळवले. फोर्स इंडियाच्या शर्यतपटूंसाठी सराव शर्यत निराशाजनक ठरली. सर्जिओ पेरेझला १३व्या तर निको हल्केनबर्गला १८व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
रोसबर्गला पोल पोझिशन
जागतिक अजिंक्यपदाच्या शर्यतीत आघाडीवर असणाऱ्या निको रोसबर्गने बेल्जियम ग्रां.प्रि. शर्यतीत सहकारी लुइस हॅमिल्टनला मागे टाकत पोल पोझिशन मिळवली.
First published on: 24-08-2014 at 06:24 IST
TOPICSहॅमिल्टन
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rosberg pips hamilton to wet pole