न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज रॉस टेलर त्याच्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावात तो लवकर बाद झाला आणि दुसऱ्या डावात त्याने फलंदाजी केली नाही. अशा स्थितीत त्याने गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी करत बांगलादेशची शेवटची विजयी विकेट घेतली. न्यूझीलंडला विजय मिळवून देऊन त्यांचा निरोपाचा सामना संस्मरणीय बनवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूझीलंडचे महान वेगवान गोलंदाज रिचर्ड हॅडली यांनी कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यातील शेवटच्या चेंडूवर विकेट घेतली. १९९० मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर हेडली यांनी डी माल्कम यांना बाद केले होते. आता ३२ वर्षांनंतर रॉस टेलरने कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात हेडलींप्रमाणेच जबरदस्त कामगिरी केली.

कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशच्या नऊ विकेट पडल्या असताना चेंडू रॉस टेलरच्या हातात सोपवण्यात आला. इबादत हुसेनने हवेत शॉट खेळला. चेंडू थेट न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमच्या हातात गेला. टेलरच्या कारकिर्दीतील ही तिसरी विकेट आहे. २००६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या नेपियर एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या टेलरने ही मालिका सुरू होण्यापूर्वीच आपल्या कारकिर्दीतील शेवटची मालिका असल्याचे जाहीर केले होते.

हेही वाचा – VIDEO: …अन् पाकिस्तानी गोलंदाजाने विकेट घेतल्यानंतर लगेच घातला मास्क; काय आहे नेमका प्रकार?

तत्पूर्वी, जेव्हा टेलर या सामन्यात शेवटच्या वेळी फलंदाजीसाठी उतरला, तेव्हाही मैदानावर उपस्थित असलेल्या प्रत्येक प्रेक्षकांनी त्याला मानवंदना दिली. संपूर्ण मैदान टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले. बांगलादेशी खेळाडूंनी एकत्र येऊन टेलरला गार्ड ऑफ ऑनर दिला. टेलर २८ धावा करून बाद झाला. त्यानंतरही पॅव्हेलियनच्या दिशेने जाताना प्रेक्षकांनी उभे राहून त्यांचे अभिनंदन केले.

बांगलादेशने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन संघ बांगलादेशकडून हरेल असे कोणालाच वाटले नव्हते. या दणदणीत पराभवानंतर आता दुसऱ्या कसोटीत किवींनी असे पुनरागमन केले, की बांगलादेशने अवघ्या तीन दिवसांत हा सामना एक डाव आणि ११७ धावांनी गमावला.