श्रीलंका-न्यूझीलंड ट्वेन्टी-२० मालिका
रॉस टेलरच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात पाच गडी राखून विजय मिळवला.
कुशल मेंडिसच्या (५३ चेंडूंत ७९ धावा) फलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने ४ बाद १७४ धावा केल्या. मेंडिसने निरोशान डिक्वेलाच्या (३३) साथीने तिसऱ्या गडय़ासाठी ६३ धावांची भागीदारी रचली.
न्यूझीलंडची ३ बाद ३९ अशी अवस्था झाली असताना टेलरने संघाचा डाव सावरला आणि १९.३ षटकांत १७५ धावांचे लक्ष्य पेलण्यात सिंहाचा वाटा उचलला. टेलरने २९ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांसह ४८ धावा केल्या. त्याने कॉलिन डी ग्रँडहोमच्या (४४) साथीने चौथ्या गडय़ासाठी ७९ धावांची भागीदारी रचली.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : २० षटकांत ४ बाद १७४ (कुशल मेंडिस ७९, निरोशान डिक्वेला ३३; टिम साऊदी २/२०) पराभूत वि. न्यूझीलंड : १९.३ षटकांत ५ बाद १७५ (रॉस टेलर ४८, कॉलिन डी ग्रँडहोम ४४; वनिंदू हसरंगा २/२१, लसिथ मलिंगा २/२३)
* सामनावीर : रॉस टेलर.