Rajat Patidar as new captain of RCB ahead IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाने आज म्हणजे गुरुवारी, आपल्या नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली. विशेष म्हणजे पहिल्यांदाच आरसीबी संघाच्या नेतृत्त्वाची धुरा एका युवा खेळाडूच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तो युवा खेळाडू दुसरा कोणी नसून रजत पाटीदार आहे. गेल्या हंगामात म्हणजेच आयपीएल २०२४ मध्ये, दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसिस आरसीबीचे नेतृत्व करताना दिसला होता, परंतु संघाने त्याला आयपीएल २०२५ साठी कायम ठेवले नाही. त्यानंतर मेगा लिलावात पुन्हा खरेदी केले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रजत पाटीदारच्या खांद्यावर पहिलं जेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी –

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून ते १७ व्या हंगामापर्यंत संघात अनेक मॅचविनर्स आणि स्टार खेळाडू असूनही, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला एकदाही विजेतेपद जिंकता आलेले नाही. आरसीबी संघ आतापर्यंत फक्त ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे, ज्यामध्ये त्यांना सर्व वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे संघाच्या नेतृत्वातही बदल दिसून आले आहेत. गेल्या तीन हंगामात फाफ डू प्लेसिस आरसीबीचे कर्णधारपद सांभाळत होता, त्याला मेगा लिलावापूर्वी संघाने कायम ठेवले नव्हते आणि त्यानंतर तो आयपीएल २०२५ साठी आरसीबी संघाचा भाग नाही.

रजत पाटीदारची आतापर्यंतची आयपीएल कारकीर्द –

२०२५ च्या आयपीएल हंगामात आरसीबी संघाचे नेतृत्व करणाऱ्या रजत पाटीदारच्या विक्रमावर नजर टाकली तर, आतापर्यंत ३१ वर्षीय उजव्या हाताच्या फलंदाजाने आयपीएलमध्ये २७ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २४ डावांमध्ये फलंदाजी करताना ३४.७४ च्या सरासरीने एकूण ७९९ धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून ७ अर्धशतके आणि एक शतक झळकले आहे.

आयपीएल २०२५ साठी आरसीबीचा संपूर्ण संघ:

विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, कृणाल पंड्या, रजत पाटीदार (कर्णधार), यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल साल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक दार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, मनोज भंडागे, जेकब बेथेल, देवदत्त पडिकल, स्वस्तिक चिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी, रोमारियो शेफर्ड, सुयश शर्मा.