दणक्यात यंदाच्या आयपीएलची सुरुवात करून आतापर्यंतच्या सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवत अपराजित राहिलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूपुढे आता आव्हान असेल ते कोलकाता नाइट रायडर्सचे. सलग दोन विजयांनंतर आता हॅट्ट्रिक साधण्यासाठी बंगळुरूचा संघ सज्ज असेल तर विजयाच्या वाटेवर परतण्यासाठी कोलकाताचा संघ उत्सुक असेल.
कर्णधार विराट कोहली, युवराज सिंग आणि ए बी डीव्हिलियर्स यांच्यावर फलंदाजीची भिस्त आहे. पहिला सामना कोहली आणि युवराज यांनी चांगलाच गाजवला होता, पण दुसऱ्या सामन्यात त्यांना एकही धाव करता आली नव्हती. पण दुसऱ्या सामन्यात पार्थिव पटेलने अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला होता. डीव्हिलियर्सला आतापर्यंत त्याचे कसब दाखवण्याची संधी मिळालेली नाही. पण बंगळुरूच्या फलंदाजी एवढी गोलंदाजी सक्षम दिसत नाही.
कोलकात्याच्या संघात रॉबिन उथप्पा आला असून त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. जॅक कॅलिस हा त्यांचा हुकमी एक्का असेल, तर फिरकीपटू सुनील नरीन आणि वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केल यांच्यावर गोलंदाजीची मुख्यत्वेकरून जबाबदारी असेल. कर्णधार गौतम गंभीर आणि युसूफ पठाण यांना मात्र अजूनही सूर गवसलेला नाही.
प्रतिस्पर्धी संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), ख्रिस गेल, ए बी डीव्हिलियर्स, युवराज सिंग, मिचेल स्टार्क, अ‍ॅल्बी मॉर्केल, वरुण आरोन, अशोक दिंडा, पार्थिव पटेल, मुथय्या मुरलीधरन, रवी रामपॉल, नीक मॅडिन्सन, हर्षल पटेल, विजय झोल, अबू नेचीम अहमद, सचिन राणा, शादाब जकाती, संदीप वॉरियर, तन्मय मिश्रा, यजुवेंद्र चहाल, योगेश ताकवले.
कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), सुनील नरीन, जॅक कॅलिस, रॉबिन उथप्पा, युसूफ पठाण, शकिब-अल-हसन, उमेश यादव, विनय कुमार, मॉर्ने मॉर्केल, पीयूष चावला, मनीष पांडे, वीर प्रताप सिंग, ख्रिस लीन, आंद्रे रसेल, एस. एस. मंडल, पॅट कमिन्स, देबब्रता दास, सूर्यकुमार यादव, मनविंदर बिस्ला, रायन टेन डोश्चटे, कुलदीप यादव.

Story img Loader