प्रत्येक हंगामात घरच्या मैदानावर दिमाखदार प्रदर्शन हे रॉयल चॅलेंजर्स संघाचे वैशिष्टय़ आहे. आखाती टप्प्यात सलग तीन लढती गमावणाऱ्या चॅलेंजर्सना विजयपथावर परतण्याची संधी घरच्या मैदानावर सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीने मिळणार आहे. भारतीय संघाचा रनमशीन असलेला विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स संघासाठी खेळताना मात्र सूर गवसलेला नाही. धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल अद्यापही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. आक्रमक फलंदाज एबी डीव्हिलियर्सच्या खेळात सातत्य नाही. यंदाच्या हंगामातील सगळ्यात महागडा आणि अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. गोलंदाजीत युझवेंद्र चहल या युवा फिरकीपटूने आपली छाप सोडली आहे. दुसरीकडे सनरायजर्स हैदराबाद पहिल्या टप्प्यात चाचपडताना दिसत आहेत. आरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर ही जोडी हैदराबादसाठी महत्त्वाची आहे. डेल स्टेन, भुवनेश्वर कुमार, इरफान पठाण, अमित मिश्रा यांच्यावर गोलंदाजांची भिस्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा