आयपीएलच्या सातव्या हंगामात १४ कोटींसह लिलावात सर्वाधिक बोली मिळवणाऱ्या युवराज सिंगला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आपल्या ताफ्यातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे खराब प्रदर्शनासह गुणतालिकेत तळाचे स्थानावर रवानगी झालेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने केव्हिन पीटरसन, दिनेश कार्तिक, रॉस टेलर यांच्यासह तेरा प्रमुख खेळाडूंना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल फ्रँचाइजींना संघाचे सुधारित संघ सादर करण्याची सोमवारी शेवटची तारीख होती.
रॉयल चॅलेंजर्स संघाने युवराजसह जगविख्यात फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन, अष्टपैलू अल्बी मॉर्केल, रवी रामपॉल यांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्स संघाने अनुभवी गोलंदाज झहीर खान आणि प्रग्यान ओझा यांच्यासह आठ खेळाडूंना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच आयपीएलची अंतिम फेरी गाठणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबने चेतेश्वर पुजारा, लक्ष्मीपती बालाजी यांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Story img Loader