नूतन बुद्धिबळ मंडळाच्या वतीने बापट बाल शिक्षण मंदिर सांगली येथे मीनाताई शिरगांवकर स्मृती आंतरराष्ट्रीय खुल्या महिला मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत नवव्या व अखेरच्या फेरीत कोल्हापूरच्या फिडेमास्टर ऋचा पुजारीने मुंबईच्या शुभदा सावंतचा ४३व्या चालीला पराभव केला. ऋचाने नऊ फेरीअखेर ९ गुण मिळवून १७ हजार रुपये रोख पारितोषिकासह चंद्राबाई आरवाडे फिरती रौप्य ढाल पटकाविली, तर शुभदाने ६.५ गुणासह ५ हजार रुपये रोख पारितोषिकासह पाचवे स्थान पटकाविले.
कोल्हापूरची फिडेमास्टर ऋचा पुजारी, माधुरी पाटील, औरंगाबादची ऋतुजा बक्षी, बँक ऑफ इंडियाची पुष्पलता मंगल, गौरी हडकोनकर, सिध्दी झांटये, असर ग्रिष्मा, निमिता जोशी, प्रिया लोटलीकर, सलोनी सापळे, रिया लाहोटी, ऋतुजा कवडे, नेहा पाटील, रिमा, तेजस्विनी नांगरे यांनी आपल्या प्रतिस्पर्धीवर विजय मिळवून आघाडी कायम ठेवली होती.

Story img Loader