‘यावर खरंच विश्वास बसत नाही. जेव्हा आम्ही लग्न केलं तेव्हा आम्ही दोघंही पोहण्यापासून दूर गेलो होतो. जणू ते जग आम्ही मागे सोडून आलो होतो. पण याच पाण्याने आम्हाला जवळ आणलं आणि आज इतक्या वर्षांनंतर पाण्याच्या साक्षीनेच नवं क्षितिजं पार करतोय’, वीरधवल खाडे आणि ऋजुता खाडे हे दोघं अव्वल जलतरणपटू. वीरधवलने ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व केलेलं तर ऋजुताने राष्ट्रीय स्तरावर आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच हैदराबाद इथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत ऋजुताने महिलांच्या ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात २० वर्ष जुना विक्रम मोडला. याच स्पर्धेत वीरधवलने ५० मीटर बटरफ्लाय आणि फ्रीस्टाईल प्रकारात अव्वल स्थान पटकावलं.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
Indian Women On Course For Clean Sweep Against West Indies
भारताचे निर्भेळ यशाचे लक्ष्य; वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना आज
Tejashri Pradhan
तेजश्री प्रधानचा सिच्युएशनशिप, बेंचिंगबाबत तरुण पिढीला सल्ला; म्हणाली, “ज्या क्षणाला तुम्ही तुमचा आत्मसन्मान…”
Shreyas Iyer 40 Runs Inning Made Mumbai Win in Low Scoring Match vs Hyderabad Vijay Hazare Trophy
Shreys Iyer: श्रेयस अय्यरची कमाल, ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला अन् २० चेंडूत पालटला सामना; मुंबईचा दणदणीत विजय
Smriti Mandhana World Record Most Runs in Calendar Year in Woman Cricket INDW vs WIW
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचा विश्वविक्रम, २०२४ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिली महिला फलंदाज
ek thali ek thaili rss
महाकुंभ २०२५! ‘एक थाळी एक थैली’ आणि ‘ समयदानी ‘ उपक्रम

मुंबईतल्या खार जिमखान्यातल्या तरणतलावाच्या साक्षीने त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. खार जिमखान्याने वीरधवलला मानद सदस्यत्व दिलं. ऋतुजा जिमखान्यातच जलतरणाचा सराव करायची.

आणखी वाचा: ‘बाबा तुम्ही खुश आहात ना’; पहाटे साडेचारला वडिलांना VIDEO CALL केल्यानंतर यशस्वी झाला होता भावूक

सुरुवातीला हाय हॅलो पुरतं त्यांचं बोलणं मर्यादित होतं. ‘वीरधवलने आमच्याबरोबर सरावाला सुरुवात केली आणि मग बोलणं होऊ लागलं असं ऋजुता सांगते. काहीवेळेला त्याने मला घरी सोडलं’, असं ऋजुता सांगते.

ऋजुताचा स्वभाव फारसा बोलका नाही तर वीरधवल रोखठोक बोलणारा कार्यकर्ता. त्या दोघांची भेट झाली तेव्हा वीरधवल ऑलिम्पिक स्पर्धेत खेळलेला जलतरणपटू होता तर ती कॉलेजला शिकणारी मुलगी होती. ‘मी सुरुवातीला त्याला मेसेज करायचे नाही’, असं ऋजुता सांगते.

‘आमची मैत्री झाली. मी लेक्चरमध्ये असताना त्याला मेसेज करायचे. पण शिक्षक तुमच्याकडे पाहून शिकवत असतील तर फोन खाली ठेऊन द्यावा लागतो. त्याला रिप्लाय द्यायला दोन मिनिटं उशीर झाला तरी …’

‘तिचा रिप्लाय आला नाही की मी काही दिवस तिचा नंबर ब्लॉक करायचो. वीरधवल खट्याळपणे हे सांगत असतो. आता ते सगळं आठवून खूप हसायला येतं. आता आम्ही एकत्रच परिपक्व झालो आहोत’, असं वीरधवल सांगतो.

आणखी वाचा: Baroda Cricket Association: किरण मोरेंना ‘हॅलो’ न म्हटल्याने विल्यम्सनं गमावलं प्रशिक्षकपद, इरफान पठाणचा गंभीर आरोप

२०१७ मध्ये वीरधवल आणि ऋजुताने लग्न केलं. या नव्या इनिंग्जच्या पायाभरणीवेळी जलतरण तलावाची साथ होती.

‘२०१४ पासून पोहण्यातला माझा रस कमी होऊ लागला. टीवायच्या परीक्षेसाठी मी जलतरणातून ब्रेक घेतला होता. त्याचवर्षी माझे कोच गेले. त्यामुळे जलतरणाची आस एकदमच कमी झाली’, असं ऋजुता सांगते.

दमदार कारकीर्द असणाऱ्या वीरधवलसाठी प्रशासकीय काम एकप्रकारे अडथळा ठरत होतं. ग्रामीण भागात तहसीलदार म्हणून त्याची नियुक्ती झाली होती. ते काम समजून घेत असताना जलतरण मागे पडलं.

२०१६ मध्ये वीरधवलची रिओ ऑलिम्पिकवारी हुकली. पण २०१८ मध्ये जाकार्ता इथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेद्वारे पुनरागमन करण्याचा त्याने निर्धार केला. त्याने त्याचा मुक्काम बंगळुरूला हलवला. ऋजुताही तिथेच होती.

‘त्यावेळी माझं वजन आतापेक्षा २० किलो जास्त होतं. मला ते कसंतरीच वाटायचं. त्यामुळे मी जिमला जाऊ लागले. वीरधवलने सुचवलं की तू पुन्हा स्वीमिंगला सुरुवात कर, मी त्याचं ऐकलं’, असं ऋजुता सांगते.

वीरधवलचा सल्ला प्रमाण मानत ऋजुताने जलतरणात पुन्हा स्वत:ला झोकून दिलं. ‘माझं वजन जसं कमी होऊ लागलं तसं पोहण्यातला वेग वाढला. मी आधीपेक्षा खूपच कमी वेळात राऊंड पूर्ण करत होते’.

सराव चांगला होत होता पण प्रत्यक्ष स्पर्धेत अव्वल जलतरणपटूंविरोधात सक्षमपणे उतरण्यासाठी त्यांनी आणखी मेहनत घ्यायला सुरुवात केली.

ऋजुताने २०० मीटरऐवजी ५० मीटर प्रकार निवडला. हैदराबाद इथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत ऋजुताने २६.६१ सेकंदात शर्यत पूर्ण केली आणि २००३ मध्ये शिखा टंडन यांचा विक्रम मोडला.

२०१९ मध्ये याच स्पर्धेत ऋजुता विक्रमाच्या अतिशय समीप होती. त्यानंतर कोरोनाचं आगमन झालं. घराबाहेर पडणंच कठीण झाल्याने जलतरण ठप्पच झालं. कोरोना हळूहळू आटोक्यात येत असताना जलतरण तलाव उघडू लागले. त्याचवेळेस ऋजुताच्या मणक्याला दुखापत झाली.

‘डॉक्टरांनी मला स्कोलिओसिस झाल्याचं सांगितलं. मी पार गोंधळून गेले पण वीरधवलने सावरलं’, असं ऋजुता सांगते. ‘मी कारकीर्दीत अनेकदा दुखापतींचा, अडथळ्यांचा सामना केला आहे. फटका बसतो पण त्याचवेळेस पुनरागमनाची संधीही असते’, असं वीरधवल सांगतो.

‘२०२० टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा कोरोनामुळे लांबणीवर गेली. २०२१ मध्ये ही स्पर्धा होईल असं संयोजकांनी सांगितलं. स्पर्धा होणार की नाही याविषयी साशंकता असल्याने मी सरावच करु शकायचो नाही’, असं वीरधवल सांगतो. ध्येयच नाहीसं झाल्यासारखं होतं. ऑलिम्पिकनंतर चीनच्या शून्य कोविड धोरणामुळे हाँगझोऊ आशियाई स्पर्धा वर्षभर पुढे ढकलण्यात आली. आता ही स्पर्धा २३ सप्टेंबरपासून होणार आहे.

पाच वर्षांपूर्वी जाकार्ता इथे झालेल्या आशियाई स्पर्धेत वीरधवलचं पदक ०.०१ सेकंदाने हुकलं होतं. ती सल अजूनही त्याच्या मनात कायम आहे. ते चित्र बदलण्याची संधी वीरधवलकडे आहे.

‘ज्यादिवशी माझं पदक हुकलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी ऋजुताबरोबर शॉपिंगला गेलो. पदक गमावलं होतं पण दैनंदिन आयुष्य सुरळीतपणे सुरू होतं.

जलतरण क्षेत्रातील खेळाडूच पत्नी असल्यामुळे मी त्या परिस्थितीचा चांगल्या प्रकारे सामना करु शकलो. माझ्या मनाची स्थिती ऋजुता समजू शकत होती. मी शांतपणे संयमाने परिस्थिती हाताळली. पण जिद्द सोडली नाही’.

‘ती माझ्या आयुष्यातली सर्वोत्तम वर्ष होती. मी तरणतलावात सराव करत नसेन तरी मला अपराधी वाटायचं नाही. हैदराबादमधल्या ऋजुताच्या कामगिरीने मी अतिशय आनंदी आणि समाधानी आहे. मला तिचा अभिमान वाटतो. पुढच्या वेळेस मी दोन विक्रम मोडून तिच्यापेक्षा एक स्थान पुढे असेन’, असं वीरधवल हसत हसत म्हणतो.

Story img Loader