आशियाई क्रीडा स्पर्धेत (१९६२) चार बाय चारशे मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक मिळविणारे माखन सिंग या दिवंगत धावपटूंच्या पत्नी सुलींदर कौर यांना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दोन लाख रुपयांची मदत दिली.
क्रीडामंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले, ‘‘सुलिंदर कौर या हलाखीचे जीवन जगत असल्याचे वृत्त कळल्यानंतर त्यांना राष्ट्रीय क्रीडापटू कल्याणकारी निधीतून ही मदत देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदक मिळविणारे सर्वच खेळाडू देशासाठी अभिमानास्पद व्यक्ती आहेत. त्यांचा आदर्श पुढे ठेवत अन्य खेळाडूंनी देशाचा नावलौकिक वाढवावा. कौर यांना आम्ही आमच्या अधिकारात शक्य तेवढी मदत केली आहे. आम्ही यापूर्वी २००९मध्येही त्यांना तीन लाख रुपयांचे साहाय्य केले होते. आम्ही पंजाब शासनालाही कौर यांना जास्तीत जास्त मदत करावी, असे आवाहन केले आहे.’’

Story img Loader