युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचे रशियाला गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाने (आयएसएसएफ) रशिया आणि बेलारूसमधील खेळाडूंना नेमबाजीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामधून हद्दपार करण्याचा निर्णय बुधवारी घेतला.

सध्या कैरो (इजिप्त) येथे विश्वचषक नेमबाजी स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत रशियाचे नेमबाजही सहभागी झाले आहेत; परंतु ‘आयएसएसएफ’ने घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना उर्वरित स्पर्धेतून नाइलाजास्तव माघार घ्यावी लागेल. युक्रेनशी युद्ध पुकारल्यामुळे जगभरातील क्रीडा संघटनांनी रशियावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) सोमवारी केले.

reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
butter theft in russia amid ukrain war
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?
two kerala ias officers suspended over hindu muslim whatsapp group
अन्वयार्थ : ‘कर्त्यां’चा बेभानपणा!
Maharashtra assembly elections 2024 independent candidate getting support from mahayuti maha vikas aghadi Unsatisfied leader in bhandara Vidhan sabha
भंडारा विधानसभेत अपक्ष उमेदवारांचा बोलबाला? युती-आघाडीतील असंतुष्ट अपक्षांच्या पाठिशी!
sex ministry in russia
‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?
Vladimir putin Narendra Modi Reuters
Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?

‘‘आयओसीच्या आदेशांचे पालन करणे गरजेचे आहे. क्रीडा क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला थारा नाही. युक्रेनवरील हल्ल्याचा आम्हाला खेद असून पुढील आदेशांपर्यंत रशिया आणि बेलारूसमधील सर्व नेमबाजांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागास मनाई असेल,’’ असे ‘आयएसएसएफ’ने निवेदनात म्हटले. मुख्य म्हणजे ‘आयएसएसएफ’चे अध्यक्ष व्लादिमीर लिसिन आणि सरचिटणीस अ‍ॅलेक्झांडर रँट्नर हे रशियाचेच नागरिक आहेत.

रशियावर आतापर्यंत फुटबॉल, हॉकी, रग्बी, बॅडिमटन, आइस स्केटिंग, व्हॉलीबॉल यांसह आणखीही काही खेळांतील संघटनांकडून निलंबन लादण्यात आले आहे. जलतरण, अ‍ॅथलेटिक्सच्या संघटनांनी त्यांच्याविरोधात सावध पावित्रा स्वीकारला आहे. मात्र युक्रेनमधील स्थिती अधिक बिघडल्यास रशियाचे संपूर्ण क्रीडा क्षेत्र उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.

युक्रेनच्या स्विटोलिनाची रशियाच्या पोटापोव्हावर मात

मेक्सिको : माँटेरेरी खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत युक्रेनच्या एलिना स्विटोलिनाने रशियाच्या अनास्तासिया पोटापोव्हावर ६-२, ६-१ असा विजय मिळवला. अग्रमानांकित स्विटोलिनाने पोटापोव्हाविरुद्ध लढत खेळण्यास नकार दिला होता. रशिया किंवा बेलारसच्या खेळाडूंना या स्पर्धेत राष्ट्रीय ध्वजाशिवाय सहभागाची परवानगी दिल्यामुळे स्विटोलिनाचा विरोध मावळला होता. ‘‘स्पर्धेद्वारे मिळणारी पारितोषिक रक्कम मी युक्रेनच्या सैन्यासाठी देईन,’’ असे स्विटोलिनाने म्हटले आहे. माँटेरेरी स्पर्धेच्या विजेत्याला ३१ हजार डॉलर पारितोषिक रक्कम दिली जाणार आहे.

भारत-बेलारूस फुटबॉल सामना रद्द

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि बेलारूस यांच्यात २६ मार्च रोजी होणारा आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना रद्द करण्यात आला आहे. भारतीय संघ २३ मार्चला बहरीनविरुद्ध खेळणार असून त्यानंतर २६ तारखेला भारत बेलारूसशी दोन हात करणार होता. बेलारूसच्या जागी अन्य एखाद्या संघाशी भारताला खेळवण्यात येईल.

रशियन अ‍ॅथलीट्स पॅरालिम्पिकमध्ये खेळणार

बीजिंग : बीजिंग येथे ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या हिवाळी पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत रशिया आणि बेलारूसच्या क्रीडापटूंना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या स्पर्धेत ते देशाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाहीत. तसेच त्यांनी मिळवलेल्या पदकांचाही गुणतालिकेत समावेश केला जाणार नाही. १३ मार्चपर्यंत खेळवण्यात येणाऱ्या हिवाळी पॅरालिम्पिकमध्ये ७१ रशियन आणि २० युक्रेनचे खेळाडू असतील.