वृत्तसंस्था, मॉस्को : युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धाचा निर्णय न पटल्यामुळे रशियाच्या अनेक ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंनी देशत्याग केला आहे. युद्ध संपल्यावरही देशात परतण्याची इच्छा नसल्याचे ठाम मत या बुद्धिबळपटूंनी व्यक्त केले आहे. युक्रेनशी चालू असलेल्या युद्धाला विरोध दर्शवणारे पत्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना काही बुद्धिबळपटूंनी स्वाक्षरीसह दिले आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या फिडे ग्रां. प्रि. बुद्धिबळ स्पर्धेत दिमित्री अँड्रीकिन, व्लादिमीर फेडोसीव्ह आणि अ‍ॅलेक्झांडर प्रेडके हे ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. मात्र स्पर्धा संपल्यानंतर ते रशियात परतलेच नाही. अँड्रीकिन उत्तर मॅसेडोनिया, तर प्रेडकेने उझबेकिस्तान गाठले. फेडोसीव्ह आणि डॅनिल युफासमवेत स्पेनमध्ये गेला. लवकरच ग्रँडमास्टर किरिल अ‍ॅलेक्सींकोसुद्धा स्पेनकडे रवाना होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रँडमास्टर अ‍ॅलेक्सी सराना हा सर्बियाची राजधानी बेलग्रेडला झालेल्या ग्रँडमास्टर स्पर्धेनंतर ‘फिडे’ ग्रां. प्रि. स्पर्धेतही खेळला. परंतु स्पर्धेनंतर रशियात परतण्याऐवजी त्याने चक्क बेलग्रेड येथेच सहा महिन्यांसाठी घर भाडय़ाने घेतले आणि तो तिथेच थांबला आहे. उन्हाळी सुटीसाठी स्पेनमध्ये गेलेल्या ग्रँडमास्टर निकिता विटियुगोव्हने आपला मुक्काम काही दिवसांसाठी लांबवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रँडमास्टर अलेक्झांड्रा कोस्टेन्यूक ही गेले काही दिवस फ्रान्समध्येसुद्धा होती. परंतु तूर्तास तरी मॉस्कोत परतण्याचा आपला विचार नसल्याचे अलेक्झांड्रा ने म्हटले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia chess players emigrate war russia grandmaster chess players ysh