उत्तेजक सेवनाच्या वाढत्या घटनांमुळे जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीने (वाडा) रशिया, तसेच अन्य काही देशांमधील उत्तेजक प्रतिबंधक पद्धतीबाबत चौकशी करण्याचे ठरविले आहे. रशियात उत्तेजक सेवनाबाबत गैरप्रकार होतात व तेथील खेळाडूंना संघटनेकडूनच पाठीशी घातले जाते हे लक्षात घेऊन ‘वाडा’ संस्थेने रशियन धावपटूंवर काही कालावधीसाठी बंदी घालण्याची शिफारस केली होती. त्यानुसार आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाने रशियन संघटनेची मान्यता काढून घेतली आहे. मात्र अजूनही रशियन खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळत असल्यामुळे तेथील पद्धतीची पुन्हा पाहणी करण्याचा निर्णय ‘वाडा’ संस्थेने घेतला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Mar 2016 रोजी प्रकाशित
उत्तेजकांबाबत रशियाची पुन्हा चौकशी होणारम
अन्य काही देशांमधील उत्तेजक प्रतिबंधक पद्धतीबाबत चौकशी करण्याचे ठरविले आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 16-03-2016 at 06:00 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia exciter enquiry