उत्तेजक सेवनाच्या वाढत्या घटनांमुळे जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीने (वाडा) रशिया, तसेच अन्य काही देशांमधील उत्तेजक प्रतिबंधक पद्धतीबाबत चौकशी करण्याचे ठरविले आहे. रशियात उत्तेजक सेवनाबाबत गैरप्रकार होतात व तेथील खेळाडूंना संघटनेकडूनच पाठीशी घातले जाते हे लक्षात घेऊन ‘वाडा’ संस्थेने रशियन धावपटूंवर काही कालावधीसाठी बंदी घालण्याची शिफारस केली होती. त्यानुसार आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने रशियन संघटनेची मान्यता काढून घेतली आहे. मात्र अजूनही रशियन खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळत असल्यामुळे तेथील पद्धतीची पुन्हा पाहणी करण्याचा निर्णय ‘वाडा’ संस्थेने घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा