रशियाने युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धाचे पडसाद सध्या संपूर्ण जगावर उमटत आहेत. रशियाने युद्ध पुकारल्याने अमेरिकेसह अनेक देशांनी निषेध व्यक्त केला असून त्यांच्यावर निर्बंध लावले आहेत. निर्णयाचा विरोध होत असताना दुसरीकडे रशियाने मागण्या मान्य करण्यात आल्या तरच युक्रेनवरील लष्करी कारवाई थांबवण्यात येईल, असं अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रविवारी सांगितले. पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांची तुलना त्यांनी युद्धाशी केली आहे. यादरम्यान रशियाच्या एका खेळाडूच्या कृत्यावरुन सध्या जगभरात संताप व्यक्त होत आहे.
“जर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींची हत्या झाली तर…,” अमेरिकेने सांगितला प्लान
रशियाचा जिम्नॅस्ट इव्हान कुलियाक (Ivan Kuliak) याने युक्रेनच्या खेळाडूसोबत व्यासपीठावर उभं असताना कपड्यांवर युद्धाचं प्रतीक दर्शवल्याने जोरदार टीका होत आहे. रशियाचा माजी ज्युनिअर चॅम्पियन कुलियाक डोहामध्ये पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर आला होता. युक्रेनच्या इलिया कोव्हटुन (Illia Kovtun) दुसऱ्या क्रमांकावर होता.
Russia Ukraine War: “विमानांवर चीनचे झेंडे लावून रशियावर बॉम्ब टाका”, डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्ला
यानंतर जेव्हा पदकं घेण्यासाठी खेळाडू व्यासपीठावर उभे राहिले तेव्हा रशियाच्या इव्हान कुलियाकच्या कपड्यांवर झेड (Z) अक्षर स्पष्ट दिसत होतं. रशियन भाषेत विजयाचं प्रतीक असणारं ‘Z’ हे अक्षर व्लादिमीर पुतिन यांचे टँक आणि इतर लष्करी वाहनांच्या समोर चिकटवलेले आहे. इव्हान कुलियाकला गेल्या वर्षी लष्कराचं प्रशिक्षण मिळालं आहे. इव्हानच्या शर्टवरील ‘Z’ अक्षर रशियन झेंड्याच्या जागी होतं. यावर आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स फेडरेशनने बंदी घातली होती. त्यांनी रशिया आणि बेलारूसमधील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
पुतीन समर्थक राजकारणी, कार्यकर्ते आणि प्रभावशाली व्यक्तींनी देखील युद्धाला पाठिंबा दर्शवण्यासाठी ‘Z’ अक्षर असलेले कपडे आणि बॅज घातलेले याआधी दिसलं आहे. दरम्यान रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने ‘Z’ चा अर्थ विजय असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.