भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. तिथे दोन्ही देशांदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिले दोन सामने झाले असून आज (२२ ऑगस्ट) तिसरा सामना होणार आहे. पहिल्या दोन सामन्यांत संधी न मिळालेल्या खेळाडूंना आजच्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. अशा खेळाडूंमध्ये ऋतुराज गायकवाडचाही समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऋतुराजची एक छोटीशी मुलाखत आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केली आहे. या मुलाखतीत ऋतुराजने काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. यातील एका प्रश्नाचं उत्तर देताना त्याने कमालीची हुशारी दाखवली आहे. ऋतुराजने दिलेल्या उत्तरामुळे सोशल मीडियावर त्याच्या हजरजबाबीपणाचे चाहते कौतुक करत आहेत.

मुलाखतीदरम्यान, ऋतुराजला एक गोंधळात टाकणारा प्रश्न विचारण्यात आला होता. ‘एमएस धोनीसह प्रशिक्षण सत्रामध्ये सराव करायला आवडेल की सचिन तेंडुलकरसह डिनर करायला आवडेल?’, असा तो प्रश्न होता. यावर ऋतुराजने क्षणाचाही उशीर न करता अतिशय हुशारीने उत्तर दिले. तो म्हणाला, “मी अगोदर धोनीसह सराव करून नंतर सचिनसोबत जेवायला जाईन”.

याच मुलाखतीदरम्यान, ऋतुराजने आपल्या काही आवडीनिवडींबद्दल सांगितले. जेव्हा राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच या दिग्गजांपैकी एकाची निवड करण्यास सांगितले तेव्हा त्याने रॉजर फेडरर आपला आवडता टेनिसपटू असल्याचे सांगितले. याशिवाय, ऋतुराजला ‘डोसा’ हा खाद्यपदार्थ आवडतो. लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर कसोटी पदार्पण करायचे आहे, असेही त्याने सांगितले.

हेही वाचा – FTX Crypto Cup: १७ वर्षीय प्रज्ञानंदने विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला केलं पराभूत; ठरला स्पर्धेचा उपविजेता

दरम्यान, आज हरारे स्पोर्ट्स क्लब क्रिकेट मैदानावर भारत विरुद्ध झिम्बाब्वे तिसरा एकदिवसीय सामना होणार आहे. भारताने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून २-० अशी विजयी आघाडी मिळवलेली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruturaj gaikwad came up with a smart response about training with ms dhoni or dinner with sachin tendulkar vkk