Ruturaj Gaikwad faces race against time 60 seconds in hand to deliver a Match Report : सध्या एकदिवसीय विश्वचषकानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ४४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. यामुळे भारतीय खेळाडू खूपच निश्चिंत आहेत. कारण टीम इंडियाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. रविवारी सामना संपल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि अक्षर पटेल यांचा एक मजेशीर व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
वास्तविक, बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अक्षर पटेलने ऋतुराजला एक चॅलेंज दिले होते, जे ऋतुराजला केवळ ६० सेकंदामध्ये पूर्ण करायचे होते. ऋतुराज गायकवाडनेही हे चॅलेंज अगदी व्यवस्थित पूर्ण केले. व्हिडीओमध्ये दोघेही मजा करताना दिसत आहेत. यावर चाहतेही आपल्या प्रतिक्रिया देताना दिसले.
अक्षर पटेलने ऋतुराजला दिले चॅलेंज –
वास्तविक, अक्षर पटेलने ऋतुराजला एक टास्क दिला की ६० सेकंदात संपूर्ण सामन्याचा अहवाल सांगायचा. या दरम्यान अक्षर ऋतुराजला म्हणाला की, मी तुझे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करेन, परंतु तू थांबायचे नाही. आणि तू थांबलास तर हे आव्हान पूर्ण मानले जाणार नाही. यानंतर ऋतुराजने क्षणाचाही विलंब न लावता, हे चॅलेंज स्वीकारले. मग वेळ होताच गायकवाडने सामन्याचा अहवाल देण्यास सुरुवात केली. यावेळी अक्षरने त्याला खूप विचलित करण्याचा प्रयत्न केला, परंतु गायकवाडने हे टास्क पूर्ण केला.
हेही वाचा – IPL 2024: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतल्यानंतर, दोन्ही संघांच्या मालकांनी काय म्हटले? जाणून घ्या
ऋतुराजने अवघ्या ५५ सेकंदात सामन्याचा अहवाल पूर्ण केला –
अक्षर पटेल विचलित करत असतानाही ऋतुराज गायकवाडने अवघ्या ५५ सेकंदात संपूर्ण सामन्याचा अहवाल सांगितला. ऋतुराजने नाणेफेकीची माहिती देऊन अहवालाला सुरुवात केली. त्यानंतर त्याने यशस्वीसोबतच्या भागीदारीचा उल्लेख केला. त्यानंतर इशानच्या खेळीचा उल्लेख केला. यानंतर गायकवाडने आपल्या अहवालात सूर्यकुमार यादव आणि रिंकूच्या खेळीचा समावेश केला. यावेळी अक्षर पटेल ऋतुराजला विचलित करत राहिला, मात्र त्याने सामन्याचा अहवाल वाचणे सुरूच ठेवले.
हेही वाचा – ‘बेगानी शादी में अबदुल्ला…’, भारत-पाकिस्तानच्या पराभवाचा आनंद साजरा करणाऱ्या लोकांना वसीम-गौतमने फटकारले
भारताच्या दमदार फलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाने टेकले गुडघे –
ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करत धावफलकावर २३५ धावा नोंदवल्या होत्या. प्रत्युत्तरात २३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, ऑस्ट्रेलियाचा संघ २० षटकांत केवळ १९१ धावा करू शकला आणि भारताने ४४ धावांनी सामना जिंकला. ऋतुराज गायकवाड (५८), यशस्वी जैस्वाल (५३) आणि इशान किशन (५२) यांनी अर्धशतके झळकावली. रिंकूने ९ चेंडूत ३० धावा केल्या.