Ruturaj Gaikwad Out of Test Series : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऋतुराज गायकवाडच्या रूपाने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ऋतुराज दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला. त्यानंतर आता बीसीसीआयने ऋतुराज गायकवाडच्या जागी कसोटी संघात कोणाची वर्णी लागणार हे बीसीसीआयने अद्याप अधिकृतपणे निश्चित केलेले नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार त्याच्या जागी अभिमन्यू ईश्वरनला संधी मिळू शकते, असे बोलले जात आहे. इतर काही खेळाडूंचा संघात प्रवेशही झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसऱ्या वनडेत झाली होती दुखापत –

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान ऋतुराज गायकवाडला दुखापत झाली होती. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना गायकवाडच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे गायकवाड मालिकेतील तिसऱ्या खेळू शकला नाही. या सामन्यात त्याच्या जागी रजत पाटीदारचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. रजत पाटीदारचा हा पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना होता. सध्या ऋतुराज गायकवाड बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहेत.

अभिमन्यू ईश्वरन पदार्पण करू शकतो –

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी संघात ऋतुराज गायकवाडच्या जागी अभिमन्यू ईश्वरनचा समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे अभिमन्यू टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिमन्यूची प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी झाली आहे. सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडिया अ मध्ये अभिमन्यूचाही समावेश आहे. अभिमन्यूने प्रथम श्रेणीत ८८ सामने खेळले असून त्यात त्याने ६५६७ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने २२ शतके आणि २६ अर्धशतके केली आहेत.

हेही वाचा – VIDEO : कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज! रोहित-विराटने या ‘फॉरमॅट’बद्दल व्यक्त केल्या भावना, जाणून घ्या काय म्हणाले?

भारताचा कसोटी संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाशदीप, . जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruturaj gaikwad has been ruled out of the test series due to injury and bcci has included him in the indian team vbm