Ruturaj Gaikwad Instagram Story on Ranji Trophy Match: सध्या रणजी ट्रॉफीचे सामने खेळवले जात आहेत आणि प्रत्येक सामने मोठे रंजक होत आहेत. महाराष्ट्र वि रेल्वे सर्विसेस यांच्यात सामना खेळवला जात आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघाचा खेळाडू ऋतुराज गायकवाड मात्र सध्या ऑस्ट्रेलियात आहे. यादरम्यानच भारतीय अ संघ ऑस्ट्रेलिया अ संघाविरूद्ध ऑस्ट्रेलियात सामने खेळत आहे, या संघाचा ऋतुराज गायकवाड कर्णधार आहे. पण ऑस्ट्रेलियात असूनही ऋतुराजची नजर महाराष्ट्रात होणाऱ्या रणजी सामन्यावर आहे. याबाबत त्याने एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.

IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Rohit Sharma Statement Rishabh Pant Controversial Wicket in IND vs NZ Mumbai test said The bat was close to the pads
IND vs NZ: “सर्वांसाठी सारखेच नियम ठेवा…”, ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्मा भडकला, खरंच पंत नॉट आऊट होता?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
Aaron Finch Befitting Reply to Sunil Gavaskar on Statement About Rohit Sharma Misses 1st Test Said If Your wife is going to have a baby IND vs AUS
Rohit Sharma: “रोहितला त्याच्या मुलाच्या जन्मासाठी थांबायचे असेल…”, हिटमॅनबद्दलच्या वक्तव्यावर आरोन फिंचने गावस्करांना दिले चोख प्रत्युत्तर
India vs South Africa T20I Series 2024 Live Streaming Full Schedule Fixtures Squads Time Table telecast other details
IND vs SA: भारत-आफ्रिका टी-२० मालिका लाईव्ह कुठे पाहता येणार? पहिल्या-दुसऱ्या सामन्याच्या वेळा वेगवेगळ्या, वाचा सविस्तर

रणजी ट्रॉफीत महाराष्ट्र आणि सर्विसेसमध्ये सामना सुरू आहे. पहिल्या डावात सर्विसेसन २९३ धावा केल्या. तर दुसऱ्या डावात महाराष्ट्रचा संघ १८५ धावांवर सर्वबाद झाला आहे. यादरम्यानच्या एका कॅचचा व्हीडिओ ऋतुराजने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हीडिओच्या कॅप्शनमध्ये ऋतुराज म्हणाला, या कॅचवर फलंदाजाला बाद कसं काय दिलं गेलं, तेही लाईव्ह सामन्यात? झेल टिपल्याचे अपील करायला पण लाज वाटली पाहिजे. हे किव येण्यासारखं आहे. आणि खाली रणजी आणि महाराष्ट्र वि सर्विसेस सामन्याचे हॅशटॅग त्याने दिले आहेत.

हेही वाचा – Rohit Sharma: “रोहितला त्याच्या मुलाच्या जन्मासाठी थांबायचे असेल…”, हिटमॅनबद्दलच्या वक्तव्यावर आरोन फिंचने गावस्करांना दिले चोख प्रत्युत्तर

ऋतुराजने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये फलंदाजाच्या बॅटची कड घेत चेंडू स्लिपमध्ये गेला. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. महाराष्ट्र संघाचा अंकित बावणे फलंदाजी करत होता. अंकितच्या बॅटची कड घेतलेला चेंडू स्लिपमध्ये गेला, पण त्याच्याकडे पोहोचण्यापूर्वी तो चेंडू त्याच्यासमोर टप्पा पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. पण तरीही महाराष्ट्रच्या फलंदाजाला झेलबाद घोषित केले गेले. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत ऋतुराज गायकवाडने ताशेरे ओढले आहेत आणि खूपच तिखट शब्दात या विकेटचा त्याने निषेध नोंदवला आहे.

हेही वाचा – IND vs SA: भारत-आफ्रिका टी-२० मालिका लाईव्ह कुठे पाहता येणार? पहिल्या-दुसऱ्या सामन्याच्या वेळा वेगवेगळ्या, वाचा सविस्तर

Ruturaj Gaikwad Instagram Story
ऋतुराज गायकवाडची इन्स्टाग्राम स्टोरी

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वाखालील भारतीय अ संघ ऑस्ट्रेलिया अ विरूद्ध दुसरा अनऑफिशियल सामना खेळत आहे. भारतीय अ संघ पहिल्या डावात १६१ धावा करत बाद झाला. तर कर्णधार असलेल्या ऋतुराज गायकवाडला अद्याप या सामन्यांमध्ये आपल्या उत्कृष्ट खेळीने छाप पाडता आलेली नाही. दुसऱ्या अनऑफिशियल सामन्यातही ऋतुराज ४ धावा करत बाद झाला. पण ध्रुव जुरेलने ८० धावांची खेळी करत संघाची धावसंख्या १५० पार नेली.

Story img Loader