चेन्नई सुपर किंग्जचा मराठमोळा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडवर एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीसाठी महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत ऋतुराज गायकवाड महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दिसणार आहे. ४ नोव्हेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

महाराष्ट्र संघ एलिट गट अ मध्ये आहे आणि लखनऊ येथे लीग टप्प्यातील सामना खेळणार आहे. त्याचा पहिला सामना तामिळनाडूच्या संघाशी आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या ऋतुराज गायकवाडकडूनही महाराष्ट्र संघाला मोठ्या आशा असतील. ऋतुराज ऑरेंज कॅप जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने ६३५ धावा केल्या. आयपीएलमध्ये जशी कामगिरी केली तशीच कामगिरी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही करण्यास तो उत्सुक असेल. नौशाद शेखला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

हेही वाचा – VIDEO : भारीच ना..! ३ निर्धाव षटकं आणि ३ गडी बाद; पाहा गोलंदाजाचा चमत्कार

कोलकाता नाइट रायडर्सचा स्टार फलंदाज राहुल त्रिपाठी अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही आणि त्यामुळेच त्याला संघात स्थान मिळालेले नाही. मात्र, वरिष्ठ फलंदाज केदार जाधवचा संघात समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र सीएचे सचिव रियाझ बागबान म्हणाले, राहुल त्रिपाठी, सिद्धेश वीर आणि राजवर्धन हंगरगेकर यांच्या जागी स्वप्नील गुगळे, पवन शहा आणि जगदीश जोपे यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. राहुलच्या जागी नौशाद शेखला त्याच्या जागी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

महाराष्ट्र संघ

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), नौशाद शेख (उपकर्णधार), केदार जाधव, यश नहार, अजीम काझी, रणजित निकम, सत्यजित बच्छाव, तरनजितसिंग ढिल्लोन, मुकेश चौधरी, ऐशेष पालकर, मनोज इंगळे, प्रदीप दधे, शमसुजामा काझी, स्वप्नील काझी, एफ. दिव्यांग हिंगणेकर, सुनील यादव, धनराजसिंह परदेशी, स्वप्नील गुगळे, पवन शहा, जगदीश जोपे.

Story img Loader