Ruturaj Gaikwad Wedding : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून उत्तम खेळी खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एक खेळाडू म्हणजे क्रिकेटर ऋतुराज गायकवाड. मुळचा पुण्याचा असणाऱ्या ऋतुराजने त्याच्या उत्तम खेळीने चेन्नई सुपर किंग्जला विजेतेपद मिळवण्यासाठी मोठा हातभार लावला. आता आयपीएलनंतर तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ऋतुराजची सध्या लगीनघाई सुरु आहे. सध्या त्याच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपद मिळवल्यानंतर ऋतुराजने होणाऱ्या पत्नीबरोबर सोशल मीडियाद्वारे फोटो शेअर केला होता. तिथपासूनच ऋतुराजच्या लग्नाच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या होत्या. आता त्याच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. ऋतुराजची होणारी पत्नी उत्कर्षा पवारच्या हातावर ऋतुराजच्या नावाची मेहेंदी रंगली आहे. तसेच त्यानेही उत्कर्षाच्या नावाची मेहेंदी काढली आहे.

आणखी वाचा – दोन विवाहित अभिनेत्यांबरोबर होतं श्रीदेवी यांचं अफेअर, दोघांच्याही पत्नींना कळलं अन्…

‘फिलमवाला’ या इन्स्टाग्राम पेजद्वारे या दोघांच्या मेहेंदी कार्यक्रमाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. खरं तर चर्चेत असणाऱ्या व्यक्तींचं लग्न म्हटलं की, अवाढव्य खर्च, डिझायनर कपडे यांची चर्चा रंगताना दिसते. मात्र ऋतुराज याला अपवाद आहे. ऋतुराज व उत्कर्षाच्या मेहेंदी कार्यक्रमाचे फोटो पाहिले की त्यांचा साधेपणा लक्षात येतो. त्यांनी अगदी मोठा मेहेंदी कार्यक्रम केला नसल्याचं फोटोमध्ये दिसून येतं.

आणखी वाचा – घरीच २५ लोकांमध्ये विवाह उरकला, लग्नानंतरही चार ते पाच वेळाच नवऱ्याला भेटली अन्…; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा अजब खुलासा

घरगुती पद्धतीने त्यांनी हा मेहेंदी कार्यक्रम केला. शिवाय दोघांनीही अगदी साध्या पद्धतीचे ड्रेस परिधान केले होते. उत्कर्षाने शॉर्ट वेस्टर्न ड्रेस परिधान करण्यास पसंती दिली. तर दुसरीकडे ऋतुराजने साधा सदरा, पायजमा घातला होता. यामधूनच या दोघांचा साधेपणा लक्षात येतो. खरं तर त्यांच्या या साधेपणानेच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruturaj gaikwad utkarsha pawar weding mehendi ceremony photos goes viral on social media see details kmd