‘आधीच्या पिढीपर्यंत नव्हे, मलाही विचारतात-आता तुझं लग्न झालं. तुझ्या करिअरचं काय? दोन्हीकडच्या घरच्यांचा पाठिंबा आहे. पण बाहेरचे हा प्रश्न विचारतात. मला इतकं वेळा विचारलं गेलं की तू क्रिकेट कंटिन्यू करणार का? त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो- जोपर्यंत मला वाटतंय, जोपर्यंत शरीर साथ देत आहे तोपर्यंत १०० काय २०० टक्के खेळत राहणार’, महाराष्ट्राची क्रिकेटपटू उत्कर्षा पवारने ठामपणे सांगितलं. भारतीय क्रिकेटमधला उगवता तारा ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षाचं लग्न झालं. सोशल मीडियावर या लग्नाची जोरदार चर्चाही झाली. चेन्नई सुपर किंग्स संघाच्या ड्रेसिंगरुमधला ऋतुराज, उत्कर्षा आणि महेंद्रसिंग धोनी यांचा एकत्रित फोटोही व्हायरल झाला होता. ऋतुराज भारतीय संघात स्थान पक्कं करण्याच्या दृष्टीने प्रयत्नात असताना उत्कर्षा महाराष्ट्राची प्रमुख गोलंदाज म्हणून नाव कमावते आहे.

‘कॉफी क्रिकेट आणि बरंच काही’ अर्थात ‘सीसीबीके’ या कार्यक्रमात बोलताना उत्कर्षाने क्रिकेट कारकीर्द, आतापर्यंतची वाटचाल याबाबत सांगितलं. ‘माझ्या आयुष्यातून क्रिकेट वजा केलं तर बाकी काही राहत नाही. क्रिकेटभोवतीच माझं आयुष्य केंद्रित झालं आहे. क्रिकेट खेळायला आवडतं, चांगलं वाटतं. रात्री झोप व्यवस्थित झोप लागते. काहीतरी केल्यासारखं वाटतं. क्रिकेट खेळले नाही तर शांत झोप लागणार नाही’, असं उत्कर्षाने सांगितलं.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य

‘महेंद्रसिंग धोनीचा ऑराच वेगळा आहे. त्यांना भैय्या वगैरे म्हणूच शकत नाही. माझ्या तोंडून ‘सर’ असंच निघतं. ते सगळ्यांशी सहजतेने वागतात. ते अतिशय नम्र आहेत. आपल्याबरोबर एवढा मोठा माणूस आहे असं वाटतच नाही. त्यांचा सेन्स ऑफ ह्यूमर खूपच चांगला आहे. त्यांनी चेन्नई संघातील सगळ्यांना फॅमिलीसारखं सांभाळून घेतलं आहे. आयपीएल काळात घरापासून दीड दोन महिने लांब राहावं लागतं. पण त्यांच्यामुळे कुटुंबात असल्यासारखंच वाटलं. घरी आहोत असंच वाटलं’, असं उत्कर्षा म्हणाली.

‘मुलांना हरवताना मजा यायची’
क्रिकेटची आवड कशी लागली यावर उत्कर्षा सांगते, ‘माझे बाबा क्रिकेट खेळायचे. सहा वर्षांची असल्यापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मुलांना हरवताना मजा यायची. लहानपणी नाजूक होते. सतत आजारी पडायचे. त्यामुळे क्रिकेट खेळायला लागल्यावर सगळ्यांना काळजी वाटायची की बॉल लागला तर काय होईल. एखादी मोठी दुखापत झाली तर? तर काय होईल.

क्रिकेटसाठी कथ्थक सोडलं
‘मी चार वर्ष कथ्थक शिकले आहे. कथ्थकचा सराव आठवड्यातून तीन दिवस असायचा. त्याचवेळी क्रीडा स्पर्धाही सुरू होत्या. खेळताना मी पडले आणि हाताला लागलं होतं. मी तशीच कथ्थकच्या सरावाला गेले. हाताला लागलेलं पाहून गुरुंनी आईला बोलावून सांगितलं की हिला खेळायला पाठवू नका. हिच्यातला नाजूकपणा जाईल. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मी कथ्थक करायचं नाही असं ठरवलं. मी खेळू शकत नाही हे मला सहनच झालं नसतं. मी खेळता खेळता नृत्य शिकले असते. पण दोन्हीपैकी एकाची निवड करता आलं नसतं. आलं आणि मी क्रिकेटची निवड केली’, असं उत्कर्षाने सांगितलं.

सरावासाठी बसचा प्रवास
‘माझे पहिले कोच बाबाच होते. शाळेत असताना बिबवेवाडीत राहायचे. सराव आणि शाळा लांब पडू लागल्याने त्यामुळे आम्ही सहकार नगरला राहायला आलो. दहावीपर्यंत तिथेच राहिलो. शाळा संपल्यावर पुन्हा सहकार नगरला राहायला गेलो. बिबवेवाडी ते डेक्कन आणि डेक्कन ते लॉ कॉलेज आई आणि मी बसने प्रवास करायचो. किटबॅग मोठी असल्यामुळे लोक आरडाओरडा करायचे. घरी जाताना त्रास व्हायचा. कारण खूप ट्रॅफिक असायचं. मला प्रचंड भूक लागलेली असायची. मी आईला सांगायचे की रिक्षाने जाऊया पण आम्ही बसनेच जायचो. यात दमछाक होऊ लागल्याने शिंदे हायस्कूलला आलो. अन्वर शेख सर आणि संतोष जेधे सर यांच्याकडे सराव करु लागले. अन्वर शेख सरांनी बेसिक गोष्टी घोटून घेतल्या’,

झहीर खान आदर्श
कोणाला पाहून खेळायला आवडायचं या प्रश्नावर उत्कर्षाने भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानचं नाव घेतलं. ‘मला जोरात बॉलिंग करायची होती. झहीर खान माझा हिरो होता. जोरात पळत येऊन बॉलिंग करायची हेच डोक्यात होतं. सोसायटीतही खेळायचे. बाबांनाही सांगितलं की झहीर खानसारखं पळायचं आहे. ते म्हणाले, तो पळून येऊन नंतर बॉलिंग करतो. मलाही तेच करायचं आहे सांगितलं. बाबा फास्ट बॉलिंगसाठी म्हणून अन्वर शेख सरांकडे घेऊन गेले. आता मी शकील शेख सरांकडे सराव करते. रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या खेळाडूंबरोबर खेळायची संधी मिळते’. झहीर खानच्या बरोबरीने जॅक कॅलिस आवडतो असंही उत्कर्षाने सांगितलं.

‘एका स्पर्धेदरम्यान मी चांगली बॅटिंग केली. चांगली बॅटिंग करु शकते हा आत्मविश्वास मिळाला. सौराष्ट्रविरुद्ध पदार्पणाची संधी मिळाली. आई त्यावेळी मैदानात होती. ती सगळ्या सामन्यांना असते. पहिल्यांदा सामन्यात पाच विकेट्स पटकावल्या तो क्षण खूपच भारी होता. सातत्याने चांगलं खेळायचं आहे’, असं उत्कर्षा सांगते.

‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे महिलांसाठी ट्वेन्टी२०लीग सुरू करण्याबाबत रोहित पवार यांनी घोषणा केली आहे. मुलींसाठी हे मोठं व्यासपीठ असेल. खेळाचा दर्जा आणखी सुधारू शकतो. पुण्याबाहेर अनेक क्लब्स आहेत, तिथे अनेक मुली खेळत आहेत. त्यांना कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संधी मिळेल’, असं उत्कर्षाला वाटतं.

Story img Loader