Ruturaj Gaikwad’s reaction after becoming captain: बीसीसीआयने १४ जुलै रोजी आशियाई क्रीडा २०२३ मधील स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला क्रिकेट संघांची घोषणा केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत १५ सदस्यीय भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड करणार आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असला, तरी भविष्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर ऋतुराजने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बीसीसीआयने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये ऋतुराज गायकवाड सांगितले की, देशासाठी सुवर्णपदक जिंकून राष्ट्रगीत गाण्यासाठी व्यासपीठावर उभे राहण्याचे त्याचे स्वप्न आहे. ५ ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय विश्वचषक सुरू होणार असल्यामुळे बीसीसीआयने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संपूर्ण युवा संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री…
Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Prithviraj Chavan campaign in Karad, Prithviraj Chavan,
सत्ता आल्यावर कराड जिल्हा करणार – पृथ्वीराज चव्हाण
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
ICC Asks PCB to Cancels Champions Trophy 2025 Tour in POK After BCCI Objection
Champions Trophy: ICC चा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला धक्का, POK मधील ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ करंडकाचा दौरा रद्द करण्याचे दिले आदेश

कर्णधार झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड म्हणाला की, ‘मी बीसीसीआय, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली. भारतासाठी खेळणे ही नेहमीच अभिमानाची गोष्ट आहे आणि या मोठ्या स्पर्धेत संघाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. या संघातील आपल्या सर्व युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी असेल.’

रिंकू सिंगलाही मिळाले संघात स्थान –

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत निवड न झाल्यानंतर आता आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात रिंकू सिंगचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अशा अनेक नावांचाही या संघात समावेश आहे, जे गेल्या काही आयपीएल हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. अर्शदीप सिंग व्यतिरिक्त संघात वेगवान गोलंदाजीमध्ये आवेश खान, मुकेश कुमार आणि शिवम मावी आहेत.

हेही वाचा – IND vs WI 1st Test: इशान किशनने सामन्यादरम्यान अजिंक्य रहाणेची उडवली खिल्ली, VIDEO होतोय व्हायरल

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघ:

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक).
राखीव खेळाडू: यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन.