आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बीसीसीआयने घातलेल्या आजीवन बंदीप्रकरणी भारताचा जलदगती गोलंदाज एस. श्रीशांत सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवणार आहे. केरळ उच्च न्यायालयाने श्रीशांतवर घातलेली बंदी उठवत बीसीसीआयला धक्का दिला होता. ज्यावर बीसीसीआयने उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली, या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने श्रीशांतवर पुन्हा बंदी घातली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर श्रीशांतने आपली नाराजी व्यक्त केली होती.

‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत श्रीशांतने, “आपल्याजवळ सर्वोच्च न्यायालयात जाण्यावाचून कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याचं सांगितलं. मला क्रिकेट खेळता येईल की नाही हा वेगळा मुद्दा आहे, मात्र माझा स्वाभिमान मला परत मिळवायचा आहे आणि यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्यावाचून माझ्यासमोर कोणताही पर्याय नसल्याचं”, श्रीशांतने म्हणलं आहे. २०१३ साली आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर बीसीसीआयने श्रीशांत आणि अन्य दोन खेळाडूंवर आजन्म क्रिकेट खेळण्यास बंदी घातली होती.

अवश्य वाचा – बंदी बीसीसीआयने घातली, आयसीसीने नव्हे; दुसऱ्या देशाकडूनही खेळू शकतो: श्रीशांत

Story img Loader