भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सकारात्क दृष्टीकोनातून विचार करून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पराभवाचा आम्हाला कसोटी मालिकेत फायदा होईल असे म्हटले.
महेंद्रसिंग धोनी म्हणाला, एकदिवसीय मालिकेत आफ्रिकेन गोलंदाजीला सामोरे गेल्यानंतर त्याचा येत्या कसोटी मालिकेत आफ्रिकेच्या वेगवान उसळी गोलंदाजीला सामोर जाण्यास भारतीय संघाला मदतच होणार आहे. ही एक सकारात्मक गोष्ट आम्हाला या एकदिवसीय मालिकेतून मिळाली. कसोटी मालिकेसाठी भारतीय फलंदाजांना आता आफ्रिकन गोलंदाजाची चांगलीच माहिती मिळाली आहे. त्यामुळे कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांना चांगली फलंदाजी करण्याची संधी आहे. असेही धोनी म्हणाला.
कसोटी मालिकेत सकारात्मक सुरूवात होईल अशी आम्हाला आशा आहे. अष्टपैलू वेगवान गोलंदाज संघात असणे हे दक्षिण आफ्रिका संघाचे भाग्यच असल्याचेही धोनी म्हणाला. तसेच या गोलंदाजीला सडेतोड उत्तर देण्याची भारतीय फलंदाजांमध्येही क्षमता आहे. यात काहीच शंका नाही. कसोटी सामन्यात नक्कीच संघ पुनरागमन करेल असा विश्वासही धोनीने यावेळी व्यक्त केला.
अष्टपैलू वेगवान गोलंदाज संघात असणे हे दक्षिण आफ्रिकाचे भाग्य- धोनी
भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सकारात्क दृष्टीकोनातून विचार करून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पराभवाचा आम्हाला कसोटी
आणखी वाचा
First published on: 12-12-2013 at 07:50 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sa are blessed that they have so many seam bowling all rounders dhoni